Chhatrapati Sambhajinagar Crime : गोवंश तस्करांच्या टोळीला पुन्हा तीन दिवसांची पोलिस कोठडी

न्यायालयात हायव्होल्टेज ड्रामा; तस्करांकडून २३ नामांकित वकिलांची फौज; न्यायालय परिसरात ३०० समर्थकांची गर्दी; तपासाला गती
Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar Crimepudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर: शहराला हादरवून सोडणाऱ्या गोवंश तस्करीच्या आंतरजिल्हा सिंडिकेटमधील नऊ अट्टल आरोपींना न्यायालयाने पुन्हा तीन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावली आहे. सोमवारी (दि.८) या प्रकरणाच्या सुनावणीवेळी न्यायालयात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. आरोपींच्या बाजूने तब्बल २३ नामांकित वकिलांची फौज उभी होती, तर न्यायालय परिसरात सुमारे ३०० समर्थकांची गर्दी जमा झाली होती. मात्र तपास अधिकाऱ्यांनी मांडलेला तपासाचा प्रगती अहवाल पाहून न्यायालयाने आरोपींना ११ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या नेतृत्वात २७ मे रोजी जिन्सी भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवून मृत्यूच्या दाढेतून १३१ गोवंशाची सुटका करण्यात आली होती. या संघटित गुन्-हेगारी टोळीचे कंबरडे मोडण्यासाठी पोलिस आयुक्तांनी ९ मुख्य आरोपींवर थेट मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई केली.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Sambhajinagar News : कत्तलीसाठी डांबलेल्या 131 गोवंशाची सुटका

हे आरोपी गेल्या १२ दिवसांपासून कोठडीत आहेत. सोमवारी तपास अधिकारी एसीपी सागर देशमुख, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी ९ आरोपींना न्यायालयात हजर केले. सुनावणीदरम्यान तपास अधिकाऱ्याने न्यायालयात सांगितले की, या टोळीचे धागेदोरे खूप मोठे असून, आणखी अनेक साथीदारांचा शोध घेणे बाकी आहे. न्यायालयाने तिसऱ्यांदा आर- ोपींच्या कोठडीत ३ दिवसांची वाढ केली.

या संपूर्ण कारवाईच्या पार्श्वभूमीवर, कुरेशी समाजाच्या एका शिष्टमंडळाने सोमवारी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेतली. आमचा समाज अशा कोणत्याही बेकायदेशीर आणि क्रूर कृत्यांचे समर्थन करत नाही. ग्रामीण भागातून काही असामाजिक घटक शहरात येऊन हे प्रकार करतात. अशा गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी कुरेशी समाजाचे पोलिसांना पूर्णपणे सहकार्य असेल, अशी ग्वाही शिष्टमंडळाने यावेळी पोलिस आयुक्तांना दिली.

हे आहेत ९ आरोपी

मोहसीन अय्युब कुरेशी, मोहम्मद समीर मोहम्मद शरीफ कुरेशी, मुजीब ऊर्फ मुजाहेद अयुब कुरेशी, शेख कय्युम कुरेशी शेख अयुब कुरेशी, वसीम शकील ऊर्फ शफी कुरेशी, काझी कलीम अहमद काझी मोहम्मद शरीफ, सलीम कुरेशी पिता शेख चांद कुरेशी, शेख रऊफ शेख युसूफ, वहिद सांडू पटेल.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Cattle Smuggling Syndicate : गोवंश तस्कर सिंडिकेटचे ५० जण पोलिसांच्या रडारवर

नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांना माहिती द्यावी- आतापर्यंत केवळ कत्तलखाने, गोवंश वाहतूक करणारे यांच्यावर कारवाई होत होती. मात्र आता लग्नात किंवा कोणत्याही कार्यक्रमात, हॉटेलमध्ये गोमांस आणल्याचे किंवा शिजवल्याचे निष्पन्न झाल्यास, पोलिस थेट कारवाई करतील. गोवंशाची अवैध वाहतूक, कत्तल किंवा साठवणुकीची कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी निर्भयपणे डायल ११२ वर किंवा थेट माझ्या ९२२६५१४०००१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल.

प्रवीण पवार, पोलिस आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news