गंगापूर : सरासरी ६७.७२ टक्के मतदानाची नोंद

गंगापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
zp election
गंगापूर : सरासरी ६७.७२ टक्के मतदानाची नोंदFile Photo
Published on
Updated on

Gangapur: An average voter turnout of 67.72 percent was recorded

गंगापूर पुढारी वृत्तसेवा : गंगापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. तालुक्यात सरासरी ६७.७२ टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

zp election
जमीन मोजणीसाठी ३६ लाखांचा भरणा

एक-दोन ठिकाणी मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या मात्र मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.

तालुक्यात जिल्हा परिषदेचे ९ गट व पंचायत समितीचे १८ गण असून, तालुक्यातील एकूण ३४७मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरुवात झाली. तालुक्यातील एकूण मतदार संख्या २ लाख ९८ हजार ८९२ इतकी असून त्यामध्ये १ लाख ५५ हजार ७८० पुरुष मतदार तर १ लाख ४३ हजार ०९८ महिला मतदारांचा समावेश आहे. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजय राऊत व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी दिली.

zp election
Sambhajinagar News : जिल्ह्यात सरासरी 70 टक्के मतदान; उद्या मतमोजणी

सकाळी मंदगतीने मतदान

मतदानाच्या सुरुवातीच्या टप्प्यात केंद्रांवर फारशी गर्दी दिसून आली नाही. सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासांत ८.३१ टक्के मतदान झाले. दुपारी मतदानाचा वेग वाढला, दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४४.२९ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर सायंकाळी चार वाजल्यानंतर मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी वाढल्याचे चित्र दिसून आले. लिंबे जळगाव येथील मतदान केंद्रावर दुपारी दोन वाजेपासूनच महिला व पुरुष मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले.

अनेक मतदारांनी उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, प्रशासनाकडून काही ठिकाणी पोलिंग चिटचे वाटप न झाल्यामुळे तालुक्यातील बहुतांश जिल्हा परिषद गटांमध्ये अनेक मतदारांना मतदार यादीत नाव शोधताना अडचणींचा सामना करावा लागला. तरीही मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडल्याचे प्रशासनाने सांगितले.

चोख पोलिस बंदोबस्त

निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी मतदान केंद्रांची पाहणी केली. सर्व केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणूक प्रशासनाकडून संपूर्ण मतदान प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले असून मतदान शांततेत व सुरळीतपणे पार पडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news