गोदावरीच्या पवित्र तिरावर ज्ञानदानाने भाविकांची तृप्ती : महंत रामगिरी महाराज

गंगागिरी महाराज १७८ वा सप्ताहाचे पुष्प पहिले, लाखो भाविकांची उपस्थिती
गोदावरीच्या पवित्र तिरावर ज्ञानदानाने भाविकांची तृप्ती : महंत रामगिरी महाराज
गोदावरीच्या पवित्र तिरावर ज्ञानदानाने भाविकांची तृप्ती : महंत रामगिरी महाराज File Photo
Published on
Updated on

Gangagiri Maharaj 178th week Presence of lakhs of devotees

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा: प्रभू रामचंद्राच्या पदस्पशनि पावन झालेल्या दंडकारण्य भूमीमध्ये गंगागिरी महाराज यांचा सप्ताह होत आहे. गोदावरीतीरी प्रयागराज मंहाकुभाची अनभुती घेत आहोत. सप्तहाच्या माध्यमातून भक्ती, ज्ञान व अन्नदानाचा एकप्रकारे महायज्ञच असतो व आपण सर्व त्या परमात्म्यासाठी हा तपस्या यज्ञ करत असल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.

गोदावरीच्या पवित्र तिरावर ज्ञानदानाने भाविकांची तृप्ती : महंत रामगिरी महाराज
Anti-Narcotics Task Force : छत्रपती संभाजीनगरात लवकरच 'अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स'चे कार्यालय

श्री क्षेत्र शनिदेव गाव शिवारातील गोदातीरी माळावर आयोजित सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज १७८व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशीचे दिवशीचे प्रथम प्रवचन पुष्प गुंफतानी ते बोलत होते. तीन लाख भाविकांच्या उपस्थितीत भगवतगितेच्या ११ व्या अध्यायातला ५४ श्लोकावर बोलताना महाराज म्हणाले की, मन बुद्धीच्या पलीकडे असते. प्रत्येकाच्या आवडी भिन्न संस्कार भिन्न आहे, जगातील सर्वात पवित्र वस्तू ज्ञान आहे. ज्ञान हे प्राप्त करता येत नसून ते अंतरंगातून प्रकट होत असते. हे शास्त्र सांगते, परमात्मा हा अणुरेणू पेक्षा लहान तर विचार केल्यास आकाशा एवढा मोठा आहे.

दुसऱ्याचे ऐकून घेण्याची क्षमता ज्यांच्यात नसते ते जीवनात कधीच मोठे होऊ शकत नाही. ज्ञान प्राप्ती साठी चित्तशुध्दीची गरज असते, त्यासाठी कामना विरहीत मन करावे, मनाला सुमन बनवावे म्हणजे परमात्मा आपल्या आंतरंगात वास करेल. प्रत्येक जीवाच्या हृदयात राहून भगवंत त्याच्या कर्मानुसार त्याला फिरवत असतो, असे महाराज म्हणाले.

गोदावरीच्या पवित्र तिरावर ज्ञानदानाने भाविकांची तृप्ती : महंत रामगिरी महाराज
Sambhajinagar Crime : दोघांना डांबून मारहाण; लच्छू पहिलवानाला अटक

कली युगात आपल्याला वनात जाऊन हजारो वर्ष तप करणे शक्य नसते म्हणूनच सर्वसामान्य जिवाने सप्ताहातील ज्ञानदान यज्ञदान अन्नदान या परंपरा अनुभवल्या पाहिजे त्यासाठी योगीराज गंगागिरी महाराज, ब्रह्मली नारायणगिरी महाराज यांच्या सानिध्यात यावे लागेल या गोदातीरी प्रमुख प्रभू रामचंद्राने अभयारण्यात वास्तव्य केले त्याच गोदा दामात योगिराज गंगागिरी महाराज ब्रह्मली नारायणगिरी महाराज यासारख्या संताच्या सानिध्यात आपण ज्ञान यज्ञ, अन्नदान यासारख्या परंपरा पुढे नेत आहोत.

याप्रसंगी गणेश आश्रमाचे विष्णु गिरी महाराज, ज्ञांनानंदगिरीजी महाराज, चैतन्यनंदगिरीजी महाराज, विर्श्वनाथगिरीजी महाराज, राजेश्र्वरगिरीजी महाराज, रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरी महाराज, शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज सरला बेटाचे विश्वस्डत मधुकर महाराज यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती.

आमटी-भाकरीचा प्रसाद

दिवसभर टँकरने मोटार पाईपव्दारे लाखो लिटर आमटी व २५० ते ३०० गावावरून आलेल्या सर्व धर्मीय घरातील भाकरींचे ट्रॅक्टर ट्रॉलीव्दारे प्रसादरुपी वाटप करण्यात आले. या आमटी भाकरी मुळेच योगीराज गंगागिरी महाराज यांचा सप्ताह गिनीजबुक ऑफ इंडिया मध्ये नोंदविला गेला. आलेल्या भाविकांना सकाळी १० वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप सुरू असते हेच या सप्ताहाचे वेगळे वैशिष्ट्ये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news