Crime News : हॉटेल फोडून रोकड लंपास करणाऱ्या अल्पवयीन टोळीचा पर्दाफाश

तब्बल ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला.
Crime News
Crime News : हॉटेल फोडून रोकड लंपास करणाऱ्या अल्पवयीन टोळीचा पर्दाफाशfile photo
Published on: 
Updated on: 

Gang of minors who broke into a hotel and made off with cash busted

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पुंडलिकनगर रस्त्यावरील 'दादा डोसा' रेस्टॉरंटचे शटर उचकटून काऊंटरमधील रोकड आणि मोबाईल लांबवणाऱ्या अल्पवयीन टोळीचा गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. तब्बल ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. याप्रकरणी दोन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचा तिसरा साथीदार दुसऱ्या एका गुन्ह्यात आधीच बालसुधारगृहात असल्याची माहिती समोर आली आहे.

Crime News
Deepfake video : अर्थमंत्र्यांच्या डीपफेक व्हिडिओची भुरळ; कंपनी अधिकाऱ्याला १७ लाखांचा गंडा

करण्यात आला होता. २७सप्टेंबरच्या रात्री सर्व कामगार पुंडलिकनगर रोडवरील गिरिजा नगर सोसायटी येथील 'दादा डोसा रेस्टॉरंट' बंद करून घरी गेले होते. याप्रकरणी हॉटेलचे व्यवस्थापक रिहान शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील १७ हजार ३३० रुपयांची रोकड आणि मोबाईल असा ऐवज चोरून पोबारा केला होता. गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला.

Crime News
Crime News : हायकोर्टची सुरक्षा भेदून चोरी करणाऱ्या दोन महिलांना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

परिसरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरील तब्बल ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून, हा गुन्हा तीन विधीसंघर्ष बालकांनी मिळून केल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, सहायक आयुक्त (गुन्हे) पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक निरीक्षक प्रशांत गंभीरराव, उपनिरीक्षक अभिजित चिखलीकर, अंमलदार कैलास काकड, संतोष पारधे, दीपक शिंदे, संजय गावंडे, गणेश सागरे, सागर पांढरे, मनोज विखणकर यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news