

Gang of criminals arrested with pistols, knives
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नशेचे सिरप विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला सिटी चौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तिघांकडून गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, दोन चाकू, सिरपच्या १६ बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी (दि.१२) फाजलपुरा भागात करण्यात आली. इरफान ऊर्फ दानिश अयुब खान (२४, रा. बायजीप-रा), शेख शाहरुख शेख इरफान (२८, रा. हसूल) आणि शेख एजाज इब्राहिम (३५, रा. नारेगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली.
अधिक माहितीनुसार, सिटी चौक ठाण्याचे उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे हे पथकासह गस्तीवर असताना त्यांना फाजलपुरा भागात एक जण नशेचे सिरप विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी पथकासह चांदणे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील हॉटेल मेट्रोकडे धाव घेत मोपेडवर आलेल्या तिन्ही आरोपीना पकडले. अंगझडतीत दानिशच्या कमरेला गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, खाली केस, अन्य आरोपींकडे दोन चाकू, १६ सिरपच्या बाटल्या आढळून आल्या. तिघांना अटक करून सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई