Marathwada Drought: मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता तीव्र; गणेश विसर्जनाबाबत प्रशासनाचे कळकळीचे आवाहन

Chhatrapati Sambhaji Nagar ias g shrikant: अशा मंडळांनी यंदा मूर्तींचे प्रत्यक्ष विसर्जन न करता प्रतिकात्मक विसर्जन करावे, असे आवाहन
Ganpati Visarjan
Ganpati Visarjan Pudhari
Published on
Updated on

Chhatrapati Sambhaji Nagar Ganesh Visarjan 2026

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पावसाची मोठी तूट असून, काही भागांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ज्या भागात पाऊस झालेला नाही आणि तेथे मोठ्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे, अशा मंडळांनी यंदा मूर्तींचे प्रत्यक्ष विसर्जन न करता प्रतिकात्मक विसर्जन करावे किंवा पुढील वर्षी विसर्जन करावे. तसेच मूर्ती दान करण्याची संकल्पनाही राबवावी, असे आवाहन मराठवाडा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले.

मराठवाड्यात पावसाची मोठी तूट आहे. त्यात धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट सर्वाधिक असल्याचे श्रीकांत यांनी सांगितले.

मांजरा धरणात केवळ १० टक्के साठा

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील पाणीसाठ्याची परिस्थिती चिंताजनक आहे. धरणात केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक असून, उपलब्ध पाण्याच्या संरक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Ganpati Visarjan
Marathwada Rain : मराठवाड्यात ५० दिवसांपासून पावसाचा खंड

मराठवाड्यातील पिकांची परिस्थितीही समाधानकारक नसल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भातील सर्व प्रश्न कृषीमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लातूर, धाराशिव, बीडमध्ये मुख्यमंत्र्यांचा दौरा

लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याचे नियोजन सुरू आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत, अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी पाणी आरक्षित करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचेही विभागीय आयुक्तांनी सांगितले.

Ganpati Visarjan
Marathwada Farmers : मराठवाड्यात आठ महिन्यांत ६५३ शेतकर्‍यांनी जीवन संपवले

दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मराठवाड्यात बिकट परिस्थिती असून पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news