मुंबईच्या राजभवनात रंगला पावली, फुगड्यांचा खेळ

निल्लोड फाट्यावरील चिमुकल्या वारकऱ्यांचे बहारदार सादरीकरण
sillod news
मुंबईच्या राजभवनात रंगला पावली, फुगड्यांचा खेळfile photo
Published on
Updated on

Games of Pavali and Fugdi Enliven Mumbai's Raj Bhavan

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा :

तालुक्यातील निल्लोड फाटा येथील श्री माऊली गुरुकुल आश्रमच्या चिमुकल्या वारकऱ्यांनी थेट राजभवनात संतांच्या जीवनप्रवासाचे सादरीकरण केले. पावली आणि फुगडीच्या तालावर वारकरी खेळाच्या सादरीकरणाने राजभवनात पंढरीचे चैतन्य अव-तरले होते.

sillod news
Pimpalner Nagar Panchayat | पिंपळनेरच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे योगेश नेरकर; स्वीकृत सदस्यपदी डॉ. कोतकर, संभाजी अहिरराव यांची निवड

महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांच्या ६७ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधत मुंबई येथील राजभवन येथे टाळ-मृदंगाच्या गजरात एक अपूर्व भक्ती सोहळा संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मएक भारत, श्रेष्ठ भारतफया संकल्प-नेतून प्रेरणा घेत, अमरवाणी फाउंडेशनने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या सोहळ्यात निल्लोड फाटा येथील श्री माऊली वारकरी गुरुकुल आश्रमाच्या बाल वारकऱ्यांनी बहारदार सादरीकरण केले. ज्ञानोबारायांनी चालवलेली भिंत, संत जनाबाईंसोबत विठ्ठलाने दळलेले दळण, संत नामदेवरायांच्या हाताने देवाने खाल्लेली खीर, तसेच जगद्गुरू तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची कीर्तनातील ऐतिहासिक भेट अशा हृदयस्पर्शी देखाव्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

sillod news
Crime News : तिकीट वाटपावरून भाजप पदाधिकाऱ्यावर हल्ला

रामेश्वर महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या बाल वारकऱ्यांनी मुंबईच्या राजभवनापर्यंत घेतलेली ही झेप वारकरी संस्कृतीचा गौरव करणारी ठरली आहे. या यशाबद्दल बाल वारकऱ्यांचे रा. काँग्रेसचे ठगणराव भागवत, कृष्णा लहाने, हभप संदीप महाराज काकडे, पुरुषोत्तम महाराज पवार, व्यवस्थापक गजानन महाराज डिगावकर, संस्था सदस्या शारदा पवार, अकील शेख, शंकर लोखंडे, भारुडकार शरद काकडे, रमेश सुरडकर, सुशांत वाघ, मुख्याध्यापक कृष्णा जैवाळ आदींनी अभिनंदन केले आहे.

राज्यपालांकडून कौतुक

या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी बाल वारकऱ्यांच्या कलेचे आणि संस्कारांचे भरभरून कौतुक केले. तर याप्रसंगी न्यायमूर्ती मदन गोसावी यांच्यासह पद्मभूषण, पद्मश्री पुरस्कारप्राप्त उद्योग, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news