Sambhajinagar Fraud : गाझापट्टीसाठी मदतीचा मुखवटा; ९० लाखांचा निधी जमवून हडपला

एटीएसने केला पर्दाफाश; इमाम अहेमद रजा फाउंडेशनच्या बाबर विरुद्ध गुन्हा
Sambhajinagar Fraud
Sambhajinagar Crime : गाझापट्टीसाठी मदतीचा मुखवटा; ९० लाखांचा निधी जमवून हडपलाFile Photo
Published on
Updated on

Funds of Rs 90 lakhs were collected and looted in the name of aid for the Gaza Strip.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गाझापट्टीतील निर्वासितांना मदत करण्याच्या नावाखाली ९० लाखांचा ऑनलाईन निधी गोळा करून त्यातील केवळ १० लाख रुपये परदेशात पाठवले. उर्वरित ८० लाख स्वतःच्या खात्यावर घेऊन एकाने हडपल्याचा प्रकार दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) उघडकीस आणला. हा प्रकार ४ जुलै २०२४ ते ६ ऑक्टोबर २०२५ या काळात मेट्रो अपार्टमेंट, चंपा चौक, शहाबाजार भागात घडला.

Sambhajinagar Fraud
ZP Election : वैजापूर शहरात ९४९ नावे दुबार

इमाम अहेमद रजा फाउंडेशन व रजा एपॉवरमेंट फाउंडेशनचा संचालक बाबर अली सय्यद महेमूद अली सय्यद ऊर्फ सय्यद बाबर अली राजवी कादरी (रा. बदाम गल्ली, किराडपुरा) असे आरोपीचे नाव आहे. त्याने पैशाचा कुठे वापर केला याबाबत संशय असल्याने एटीएसने त्याच्यावर सिटी चौक ठाण्यात बुधवारी (दि.१२) रात्री उशिरा गुन्हा नोंद केला.

अधिक माहितीनुसार, इमाम अहमद रजा फाउंडेशन या नावाने पॅलेस्टाईन व गाझापट्टी येथील युद्धाने निर्वासित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी ऑनलाईन क्यूआर कोड व्हायरल करून त्याद्वारे निधी गोळा केला जात असल्याची माहिती एटीएसला प्राप्त झाली होती. त्यावरून एटीएसने धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे रजा फाउंडेशनची चौकशी केली. या फाउंडेशची नोंदणी मुंबईतील असून, छत्रपती संभाजीनगरात फाउंडेशनच्या वतीने यूट्यूब चॅनल रजा चालवण्यात येत असल्याचे समोर आले. अलीकडेच फाउंडेशनच्या यूट्यूबच्या चॅनलवर गाझापट्टीतील निर्वासितांसाठी निधी देण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्यासाठी क्युआर कोडही देण्यात आला होता. यूट्यूबसह फेसबुक, टेलिग्रामवरही ही मोहीम राबवण्यात आली.

Sambhajinagar Fraud
Lumpy Disease : दीड महिन्यात लम्पीने चोवीस जनावरे दगावली

या माध्यमातून ४ जुलै २०२४ ते ६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत जवळपास ९१ लाख रुपये गोळा करण्यात आले. यापैकी १० लाख रुपये एका पोर्टलवर १४ ट्रॅन्जेक्शनद्वारे परदे-शात पाठवण्यात आले असून, उर्वरित रक्कम ही सय्यद बाबर अलीच्या नावावर जमा असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे क्यूआर कोडसाठी जो मोबाईल क्रमांक देण्यात आला होता तो रजा फाउंडेशनचा नसून बाबर अलीचा असल्याचे स्पष्ट झाले.

तीन तास चौकशी

बाबर अलीला गुन्हा नोंद होताच आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी (दि.१३) चौकशीसाठी बोलावले होते. पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक मोहसीन सय्यद यांनी बाबरची रात्री आठ वाजेपर्यंत सुमारे तीन तास कसून चौकशी केली. त्याने पैसे कुठे पाठवले? किती रक्कम गोळा केली? आदी प्रश्नाचा भडीमार केला.

एटीएसने ५० रुपये पाठवून केली खातरजमा

एटीएसच्या अधिकाऱ्यांनी यूट्यूब चॅनलवर देण्यात आलेल्या क्यूआर कोडवर ५० रुपये पाठवले. ही रक्कम अहेमद रजा फाउंडेशनच्या खात्यात न जाता बाबर अलीच्या खात्यावर जमा झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर एटीएसने सखोल तपास करून क्राउड फंडिंगचा घोटाळा उघड केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news