Sambhajinagar Crime : प्रेम प्रकरणातून मित्रानेच मित्राला भोसकले, वाळूज येथील घटना

गुन्हा दाखल, दोन्ही आरोपींना परभणीतून अटक
Sambhajinagar Crime
Sambhajinagar Crime : प्रेम प्रकरणातून मित्रानेच मित्राला भोसकले, वाळूज येथील घटना File Photo
Published on
Updated on

Friend stabbed friend over love affair, incident in Waluj

वाळूज, पुढारी वृत्तसेवा पुर्ववैमनस्यातून झालेल्या प्राणघातक - हल्ल्यात दोन मित्रांनी मिळून अन्य एका मित्राचा खून केल्याची घटना वाळूजच्या नारायणनगरात बुधवारी (दि.८) रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी वाळूज पोलिसांनी दोन्ही आरोपींना अवघ्या चार तासांत परभणी येथून ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे वाळूज भागात मोठी खळबळ उडाली आहे.

Sambhajinagar Crime
ZP Election : रांजणगाव, दौलताबाद, करमाड, वाळूज एससीसाठी राखीव

याविषयी पोलिसांनी सांगितले की, वाळूज गावलगतच्या लांझी रोडवर असलेल्या नारायणनगरात वास्तव्यास असलेला प्रथमेश प्रभाकर गायकवाड (२०) हा बुधवारी रात्री ९ वाजता जेवण करून नेहमीप्रमाणे बाहेर गेला होता. दरम्यान, त्याच गल्लीतील काही मित्र हे प्रथमेश सोबत लांझी रोडवर गप्पा मारत होते. प्रथमेश मित्रांसोबत गप्पा मारत असताना रितेश नरवडे व त्याचा मित्र प्रदीप सुकासे हे दोघे एका दुचाकीवरून तेथे आले. प्रथमेश हा रितेश सोबत थोडावेळ बोलत नाही तोच रितेशने प्रथमेश याच्या बरगडीत धारदार चाकूने सपासप वार करीत त्याला भोसकले.

प्रथमेश रक्ताच्या थारोळ्यात बेश-ध्दावस्थेत निपचित पडला. माहिती मिळताच त्याचे वडील प्रभाकर गायकवाड हे घटनास्थळी धावत आले. त्यांनी रितेशला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना चाकूचा धाक दाखवत प्रदीप सुकासेसह तो घटनास्थळावरून दुचाकीवर बसून पसार झाला. वडील प्रभाकर गायकवाड यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रथमेशला १०८ रुग्णवाहिकेचे चालक राजू रोकडे व नागरिकांच्या मदतीने घाटी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून प्रथमेशला मृत घोषित केले.

Sambhajinagar Crime
Municipal Election : महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू

दरम्यान, मृत प्रथमेश आणि सदर आरोपी हे बालपणापासून मित्र होते. प्रेमप्रकरणातून त्यांचा काही दिवसांपासून आपापसांत वाद सुरू होता, असे प्रथमेशच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे.

याप्रकरणी प्रभाकर रामचंद्र गायकवाड (४५) रा. नारायणनगर, वाळूज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर आरोपीच्या विरोधात वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी येथून आरोपींना अटक

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी भेट देऊन माहिती घेऊन आरोपीचा तपास सुरू केला. गुप्त माहितीवरून पथकाने वेगवेगळ्या भागांत जाऊन रात्री माहिती घेतली. त्यात आरोपी परभणीच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने रातोरात परभणी गाठत रितेश सुनहल नरवडे (२१, रा. मनीषानगर वाळूज) आणि प्रदीप बाबासाहेब सुकासे (१९, रा. झेंडा मैदान वाळूज) या दोन्ही आर-ोपींना परभणी येथील रेल्वेस्टेशनवरून गुरुवारी सकाळी ८ वाजता मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त पंकज अतुलकर, सहाय्यक पोलिस आयुक्त संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोउपनि. अजय शितोळे, रमेश राठोड, संदीप वाघ, नारायण बुट्टे, अंमलदार संदीप धनेधर, विजय पिंपळे, सुधाकर पाटील, नितीन धुळे, शेख गफ्फार, श्रीकांत सपकाळ, स्नेहलकुमार गवळी, किशोर गाडेकर, पोलिस मित्र अमन शेख आदींनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news