जमीन विक्रीच्या नावाखाली तब्बल १.९० कोटीचा गंडा

जमीन आधीच दुसऱ्या व्यक्तीला विकलेली असतानाही त्या व्यवहाराची माहिती लपवून खोटे व बनावट जीपीए (कुलमुखत्यारपत्र) तयार केले.
sambhajinagar fraud case
जमीन विक्रीच्या नावाखाली तब्बल १.९० कोटीचा गंडाpudhari photo
Published on
Updated on

Fraud of a staggering ₹1.90 crore under the guise of land sale

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जमीन आधीच दुसऱ्या व्यक्तीला विकलेली असतानाही त्या व्यवहाराची माहिती लपवून खोटे व बनावट जीपीए (कुलमुखत्यारपत्र) तयार केले. त्यानंतर सिल्लोड येथील एका व्यापाऱ्याकडून तब्बल १ कोटी ९० लाखांहून अधिक रुपये उकळवून गंडा घालणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधारासह दोघांना आर्थिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या.

sambhajinagar fraud case
लोक आदर्श पतसंस्थेत 6 कोटींचा घोटाळा; अध्यक्ष पठाणसह 11 जणांवर गुन्हा दाखल

दिल्लीगेट) याला मुंबईतील वर्सोवा येथून तर शेख जमील शेख रसूल (रा. रोजेबाग) याला शहरातूनच बेड्या ठोकळ्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. सिल्लोड येथील आडत व्यापारी शेख इम्रान (३७) यांच्या तक्रारीनुसार, आरोपी शेख इरफान याने हिमायतनगर येथील गट क्र. १९/१ मधील जमिनीचा सौदा २ कोटींत झाला असून, गुंतवणुकीसाठी २५ लाख रुपये कमी पडत असल्याचे सांगून इम्रान यांचा विश्वास संपादन केला.

त्यांच्याकडून वेळोवेळी आरटीजीएस, फोन-पे आणि रोख स्वरूपात एकूण १ कोटी ९० लाख २५ हजार उकळले. पैशाच्या बदल्यात हिमायतनगर येथील ले-आउटमधील प्लॉट क्र. ९० आणि ९१ देण्याचे आमिष आरोपींनी दाखविले. पैसे घेऊनही प्लॉटची रजिस्ट्री करून देण्यास टाळाटाळ करण्यात आली.

sambhajinagar fraud case
Drugs Smuggler Gang : मुंबईहून ड्रग्ज तस्करी; टोळी जेरबंद

पुन्हा आरोपींनी जोगवाडा येथील १६ एकर जमिनीचे कुलमुखत्यारपत्र इम्रानच्या नावे केले. मात्र ही जमीन आधीच दुसऱ्याला विकलेली असल्याचे तलाठी कार्यालयातील चौकशीत उघड झाले. शेख इम्रान यांनी परिसरात चौकशी केली असता, आरोपी इरफान याने अशाच प्रकारे इतरही अनेक लोकांकडून पैसे घेऊन त्यांना गंडा घातल्याचे समोर आले आहे होते.

सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. आरोपी शेख इरफान फरार होता. पथकाने त्याला ६ एप्रिल रोजी मुंबईतील वर्सोवा येथून अटक केली. न्यायालयाने त्याला ११ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर दुसरा आरोपी शेख जमील याला ९ एप्रिल रोजी अटक केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news