Fraud Case : जमिनीचे आमिष दाखवून व्यापाऱ्याला ५० लाखांचा गंडा

पैशांसह आलिशान गाड्याही उकळल्या; २ जणांवर गुन्हा
Fraud News
Fraud Case : जमिनीचे आमिष दाखवून व्यापाऱ्याला ५० लाखांचा गंडाFile Photo
Published on
Updated on

Fraud Case: Businessman Swindled Out of ₹50 Lakhs on the Pretext of Land Deal

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

शहरातील हिमायतनगर येथील जमिनीचा व्यवहार करून एका व्यापाऱ्याकडून रोख रक्कम व महागड्या गाड्या घेऊन सराईत भामट्यांनी ५० लाख रुपयांचा चुना लावला. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. १६) दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fraud News
जमीन विक्रीच्या नावाखाली तब्बल १.९० कोटीचा गंडा

इरफान अजहर शेख शफिक (३७, रा. सलमान हॉल, दिल्लीगेट) आणि शेख जमील शेख गुलाम रसुल (३२, रा. रोजाबाग, आझाद कॉलेजजवळ) अशी या आरोपींची नावे असून या भामट्यांवर हा फसवणुकीचा चौथा गुन्हा दाखल झाला असून दोघे यापूर्वीच्या गुन्ह्यात जेलमध्ये आहेत.

फिर्यादी अक्रम खान इब्राहिम खान (३७, रा. कबाडीपुरा, बुड्ढीलेन) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा प्लॉटिंग आणि गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. २०२२ मध्ये अक्रम खान यांची ओळख जिल्हाधिकारी कार्यालयात इरफान शेख याच्याशी झाली होती. आपण प्लॉटिंगचा व्यवसाय करत असून स्वस्तात जमीन मिळवून देण्याचे आमिष इरफानने दाखविले. मार्च २०२५ मध्ये इरफानने हिमायतनगर येथील गट क्रमांक १९/१ मधील ५ आर जागेचा प्रस्ताव अक्रम खान यांच्यासमोर ठेवला. ही जमीन आपला सहकारी शेख जमील याच्या नावे खरेदी केल्याचे सांगून इरफानने अक्रम खान यांना जागेची पाहणीही करवून आणली. सदर जमिनीचा व्यवहार ६० लाख रुपयांत ठरला.

Fraud News
लोक आदर्श पतसंस्थेत 6 कोटींचा घोटाळा; अध्यक्ष पठाणसह 11 जणांवर गुन्हा दाखल

आरोपींनी अक्रम खान यांना विश्वासात घेऊन सुरुवातीला जागेचे कुलमुखत्यारपत्र (जीपीए) करून देण्याचे व ५० लाख रुपये दिल्यानंतर जा गेचा ताबा देण्याचे मान्य केले. उर्वरित १० लाख रुपये खरेदीखत करताना देण्याचे तोंडी ठरले. त्यानुसार २ मे २०२५ रोजी आरोपींनी अक्रम खान यांच्या नावे कुलमुखत्यारपत्र करून दिले. मात्र, एकूण ५० लाख रुपये दिल्यानंतरही आरोपींनी जमिनीचे खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ सुरू केली. वारंवार तगादा लावूनही जमिनीचा ताबा न मिळाल्याने आणि पैसेही परत न केल्याने आपली फसवणूक झाल्याचे खान यांच्या लक्षात आले. पुढील तपास उपनिरीक्षक मुठाळ करत आहेत.

शेख इरफान आणि शेख जमील यांच्या टोळीने सिल्लोड येथील अडत व्यापारी शेख इम्रान यांना १.९० कोटींचा, निवृत्त फौजदार गोरख चव्हाण व त्यांचे मित्र यासिन यांना १.३३ कोटींचा, तसेच पैठण गेट भागातील मोबाईल शॉपी चालकालाही असाच चुना लावला आहे. या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वीच अटक केली असून, ते सध्या जेलमध्ये आहेत.

आलिशान गाड्याही उकळल्या

प्लॉटच्या ५० लाखांच्या व्यवहारात आरोपींनी अक्रम यांच्याकडून केवळ रोख रक्कमच घेतली नाही, तर पैशांऐवजी त्यांच्याकडील गाड्याही उकळल्या. यामध्ये ५ लाख रुपये किमतीची महिंद्रा टीयूव्ही ३०० आणि महागड्या फॉर्च्यूनर गाडीचा समावेश आहे. ठरलेल्या रकमेतून या गाड्यांचे पैसे कमी करण्याचे आमिष दाखवत फसवणूक केली.

व्हॉट्सअॅपवर पावत्या

जमिनीच्या या व्यवहारात अक्रम खान यांनी आरोपी इरफान शेख याला जेव्हा-जेव्हा लाखो रुपयांची रोख रक्कम किंवा गाड्या दिल्या, तेव्हा त्याची नोंद म्हणून इरफानने स्वतःच्या मोबाईलवरून अक्रम यांना व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवले आहेत. यात तारखेसह अमाऊंट रिसीव्हड, प्लॉट के रिसीव्हड आणि कार रिसीव्हड अशा स्वरूपाचे मेसेज पाठवले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news