Crime News : बांगलादेशी अल्पवयीन मुलीला देहविक्रयाच्या दलदलीत ढकलणाऱ्या चौघांना १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

न्यायालयाच्या नोंदीनुसार, पीडित मुलीला भारतात नोकरीचे आमिष दाखवून बांगलादेशातून भारतात आणण्यात आले.
sambhajinagar crime news
बांगलादेशी अल्पवयीन मुलीला देहविक्रयाच्या दलदलीत ढकलणाऱ्या चौघांना १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षाfile photo
Published on: 
Updated on: 

Four sentenced to 10 years hard labor for pushing Bangladeshi minor girl into prostitution swamp

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बांगलादेशातील अल्पवयीन मुलीची मानवी तस्करी करून तिच्यावर देहविक्रयासाठी दबाव आणल्याच्या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील विशेष पोक्सो न्यायालयाने चौघांना दोषी ठरवत विविध कलमांखाली शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश स्वर्णिता बी. महाले यांनी हा निकाल दिला.

sambhajinagar crime news
Bidkin News : अति उच्च विद्युत वाहिनी तारांचा धक्का; १३ वर्षीय मुलगा गंभीर भाजला

प्रकरणातील दोषी आरोपींमध्ये सईद मेहताब शाह ऊर्फ शेख, वाजिद इलियास शेख, समीना पत्नी सईद शाह ऊर्फ शेख आणि आशा हसन शेख यांचा समावेश आहे. - त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७०(१), ३७०-अ, ३७२, ३७३, ३४३ सह ३४ तसेच अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३, ४, ५ आणि ६ अंतर्गत गुन्हे सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले.

न्यायालयाच्या आदेशानुसार कलम ३७० (१) अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी १० हजार रुपये दंड, कलम ३७०-अ अन्वये ७ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी १० हजार रुपये दंड, तर कलम ३७२ व ३७३ अन्वये प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड सुनावण्यात आला.

कलम ३४३ अन्वये २ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड, तर अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ अंतर्गत ३ वर्षे सक्तमजुरी व २ हजार रुपये दंड, कलम ४ व ५ अंतर्गत प्रत्येकी ७ वर्षे सक्तमजुरी आणि कलम ६ अंतर्गत १० वर्षे सक्तमजुरी व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. सर्व शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत.

sambhajinagar crime news
MLA Rohit Pawar : पंचनाम्यांचा खेळ नको, शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये हेक्टरी मदत द्या

न्यायालयाच्या नोंदीनुसार, पीडित मुलीला भारतात नोकरीचे आमिष दाखवून बांगलादेशातून भारतात आणण्यात आले. पुढे तिला पुणे आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात आले. येथे तिला देहविक्रयास भाग पाडल्याचे म्हणणे अभियोजन पक्षाने मांडले. पीडितेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news