एमआयएमच्या नगरसेवकांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

हातगाडी कारवाईला विरोध : कर्मचाऱ्यांना धमक्या देत लावले पिटाळून
sambhajinagar aimim news
एमआयएमच्या नगरसेवकांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखलfile photo
Published on
Updated on

Case registered against MIM corporators and activists

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहागंज येथील हातगाडी कारवाईला विरोध करत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या देत पिटाळून लावल्याप्रकरणी मनपा उपायुक्तांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयएमच्या नगरसेवकांसह ३० ते ४० कार्यकर्त्यांवर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sambhajinagar aimim news
पुसद प्रकल्पात 'पुढारी टॅलेंट सर्च' परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

शहरातील शहागंज परिसरात सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईदरम्यान एमआयएमचे नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या देत पिटाळून लावल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सविता अंनतराव सोनवणे (५४, रा. उल्कानगरी) यांनी फिर्याद दिली.

त्यानुसार, महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार शहागंज भागात रहदारीस अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या व अन्य अनधिकृत अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू होती. ही कारवाई अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष बालाजी वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे करण्यात येत होती.

sambhajinagar aimim news
मराठवाड्यातील १२ जण आखातात अडकले

दरम्यान, २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास १५ ते २० नगरसेवक व त्यांच्या ३० ते ४० कार्यकर्त्यांनी शहागंज परिसरात करत कारवाईस विरोध केला. तसेच विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद यांच्यासह इतर नगर-सेवकांनी शिवीगाळ करत महापालिकेला शहागंज परिसरात दादागिरी करू देणार नाही, अशा धमकीवजा घोषणा दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

तसेच हातगाडीधारकांना पुन्हा रस्त्यावर व्यवसाय सुरू करण्यास चिथावणी देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक निरीक्षक श्रीनिवास रॉयलवार हे करीत आहेत.

नगरसेवकांनी उमेदवारी अर्जात अतिक्रमण हटविण्यास विरोध न करण्याचे शपथपत्र दिलेले असतानाही जाणीवपूर्वक सरकारी कामात अडथळा आणला. लोकसेवकांना धमकावल्याप्रकरणी महापालिकेचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेता अब्दुल समीर साजिद, सय्यद उसामा, काकासाहेब काकडे, अकिल अहेमद, फेरोज खान, मेराज खान, मो. वाजेद जाहगीरदार, सोहेल कुरेशी, मो. वसीम अलीम अहेमद, मतीन पटेल या नगरसेवकांसह ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांना जबरदस्तीने हटवले

अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान महापालिकेचे अधिकारी संजय सुरडकर यांना धमकावत जबरदस्तीने वाहनात बसवून तेथून हाकलून लावण्यात आले, तर कंत्राटी अतिक्रमण निरीक्षक रवींद्र देसाई व इतर कर्मचारी यांना धक्काबुक्की करून अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्यानंतर जमावाने टाळ्या वाजवत अश्लील शेरेबाजी करत दहशत निर्माण केली.

तसेच अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी वापरण्यात येणारे जेसीबी वाहन, दोन ट्रक व अन्य साहित्य घटनास्थळावरून काढून घेण्यास पथकाला भाग पाडण्यात आले. त्यानंतर सार्वजनिक रस्त्यावर पुन्हा अनधिकृत हातगाड्या लावण्यास जमावाला प्रोत्साहन देण्यात आल्याचेही दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ काही नगरसेवकांनी सोशल मीडियावर प्रसारित करून प्रशासकीय अधिकाऱ्यांची जाणीवपूर्वक बदनामी केल्याचेही या तक्रारीत नमूद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news