Drown Death : हर्सूल तलावात मृत्यूचे तांडव : एकाच दिवशी चौघांचा बुडून अंत

दोन मित्रांना वाचवताना एक तरुणही बुडाला
Drown Death
Drown Death : हर्सूल तलावात मृत्यूचे तांडव : एकाच दिवशी चौघांचा बुडून अंतfile photo
Published on
Updated on

Four people drown in Harsul Lake on the same day

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा रविवारी हर्सूल तलावाच्या पाण्याने जणू मृत्यूचा सापळाच रचला होता. दुपारी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांचा दुर्दैवी अंत झाला. यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा, तर वाचवण्यासाठी उडी घेत-लेला तरुणही बुडाला. अग्निशमन दलाने तिघांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर घाटी रुग्णालयात हलवले. घटनेच्या काही वेळातच फिल्टरच्या कठड्यावरून आणखी एका तरुणाने उडी घेत आत्महत्या केली. या घटना रविवारी (दि.५) दुपारी ३ ते ३:३० वाजेदरम्यान घडल्या.

Drown Death
Sambhajinagar Crime : बेपत्ता चिमुकलीचा विहिरीत आढळला मृतदेह

अफान इस्माईल खान (१६), मैशिद ऊर्फ आदिल मोहसीन शेख (१४, दोघेही रा. निजामगंज, भवानीनगर) या दोन मित्रांचा, तर त्यांना वाचवताना करण रामचंद्र मोरे (२२, रा. अंबरहील, जटवाडा रोड) तलावात बुडाला. दरम्यान, यश संदीप देहाडे (२५, रा. सिद्धार्थनगर, एन-१२ हडको) या तरुणाने या घटनेच्या काही वेळातच उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिस निरीक्षक स्वाती केदार यांनी दिली.

निजामगंज कॉलनीत रहाणारे अफान, मैशिद आणि वासिफ हे तिघे मित्र हर्सल तलावात पोहण्यासाठी दुपारी एक वाजेच्या सुमारास गेले होते. अफान आणि मैशिद दोघे पाण्यात उतरले, तर वासिफ पोहोता येत नाही म्हणून तलावाच्या कडेला बसला होता. त्याठिकाणी आणखी एक तरुण पोहण्यासाठी आलेला होता. अफान आणि मैशिद एकमेकांचे हात धरून तलावात शिरले. काही अंतरावर पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही तलावाच्यामध्ये खोल खड्यात गाळामध्ये अडकले.

Drown Death
Sambhajinagar News : मेव्हण्याचा पाण्यात बुडून मृत्यू; साल्याने जीवन संपवले

एकाच वेळी दोघे पाण्यात बुडत असल्याचे पाहून अनोळखी तरुणाने पाण्यात उडी घेऊन दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने तिघेही काही कळण्याच्या आत पाण्यात बुडाले. त्याचवेळी बाहेर बसलेल्या वासिफने आरडाओरड सुरू केली. अफानच्या वडिलांना कॉल करून हसूल तलावात त्यांचा मुलगा आणि मैशिद बुडत असल्याचे सांगितले. आरडाओरड करूनही आसपास कोणीही नसल्याने त्यांना मनपाचे सुरक्षारक्षक राजेंद्र वेळेत मदत भेटली नाही. त्यानंतर गवळे यांनी अग्निशमनला कॉल केला. काही वेळातच एन-९ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेच पाण्यात उतरत तिघांचा शोध घेतला. तिघांचा मृतदेह बाहेर काढून त्यांनी घाटीत हलवले.

फिल्टर जवळून उडी घेत आत्महत्या

तिघांचे मृतदेह बाहेर काढून अग्रिशमन दल अध्या रस्त्यात असताना यश देहाडे या तरुणाने तलावाच्या फिल्टर जवळ कठड्यावरून तलावात उडी घेतली. ही बाब सुरक्षारक्षकाने बघितली. त्याने तरुणाला वाचवण्यासाठी काठी दिली. मात्र काही क्षणात तरुण पाण्यात बुडाला. त्याला अग्रिशमनच्या जवानांनी पाण्यातून बाहेर काढत तात्कळ घाटीत हलविले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. उपअग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, ड्यूटी अधिकारी वैभव बाकडे, लक्ष्मण कोल्हे, अग्निशामक जवान अशोक पोटे, विक्रम भुईगल, शिवाजी काकडे, गजानन गावंडे आदीचा अग्निशमन दलाच्या पथकात समावेश होता. हर्सल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वडिलांचा आधार हरपला

अफानही नववीतच होता. पाच भावंडांमध्ये असलेला अफान शाळेनंतर प्लंबर असलेल्या वडिलांना कामात मदत करत असे. त्याचा मृतदेह घाटी रुग्णालयात पाहिल्यानंतर वडिलांनी जो हंबरडा फोडला, त्याने तिथे उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले.

निजामगंज परिसरात शोककळा

अफान आणि मैशिद यांची घरे निजामगंज भागात एकाच गल्लीत आहेत. दोघांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच नातेवाईक आणि रहिवाशांनी त्यांच्या घरासमोर मोठी गर्दी केली होती. संपूर्ण भवानीनगर आणि निजामगंज परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

दोघांचे हात एकमेकांच्या हातातच

मैत्री अशी असावी की मृत्यूनेही तिचा हेवा करावा. मात्र हसूल तलावावर नियतीने या मैत्रीचा अघोरी खेळ मांडला की पाहणाऱ्यांचेही डोळे पाणावले. पाण्यात बुडताना एकमेकांना वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या अफान आणि मैशिद दोन मित्रांचा शेवट इतका करुण होता की, जेव्हा त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तेव्हाही त्यांचे हात एकमेकांच्या हातात अडकलेले होते. जणू मृत्यूच्या पलीकडेही ही साथ सुटायला नको, अशीच त्यांची ती घट्ट मिठी होती.

दुचाकी गॅरेजला नेण्याचे सांगूनही मुले तलावाकडे

रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अफानच्या वडिलांनी त्याला दुचाकी गरेजला सव्हीसिंगसाठी नेण्यास सांगितले होते. त्यानंतर ते पडेगाव येथे प्लंबिंगच्या कामावर गेले. मात्र अफानने दुचाकी घेऊन मित्र मैशिद आणि वासिफसह तलाव गाठला. अफानला चांगले पोहता येत होते, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. दुपारी सव्वातीनला वासिफचा फोन आल्यावर वडील तलावाकडे धावले, पण तोपर्यंत उशीर झाला होता.

डोळ्यांदेखत मित्र बुडाल्याने वासिफ बेशुद्ध

अफान आणि मैशिद हे वासिफच्या समोरच पाण्यात बुडाले. आपल्या जीवलग मित्रांना असे बुडताना पाहून तो हतबल झाला होता. अग्निशमन दलाने जेव्हा त्यांचे मृतदेह बाहेर काढले, ते दृश्य पाहून वासिफला मोठा धक्का बसला आणि तो तलावाजवळच बेशुद्ध पडला.

एकुलता एक मुलगा गमावला

मैशिद हा इयत्ता नववीत शिकत होता. त्याचे वडील टेलरिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दोन बहिणींच्या पाठीवर असलेला तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूची बातमी धडकताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news