Crime News : माजी नगरसेवक रफत खान यांच्यावर जीवघेणा हल्ला

टोळक्याने रॉड, काठ्यांनी फोडले डोके
Sambhajinagar Crime News |
Crime News : माजी नगरसेवक रफत खान यांच्यावर जीवघेणा हल्लाFile Photo
Published on
Updated on

Former Corporator Rafat Khan Attacked in Life-Threatening Assault

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील राजकीय वर्चस्वाचा वाद आता टोकाला पोहोचला असून, गुरुवारी (दि.२६) दुपारी माजी नगर-सेवक रफत यार खान यांच्यावर जुना बाजार परिसरात ४ ते ५ जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला.

Sambhajinagar Crime News |
Monkey terror in Nanded| धर्माबादमधील साईनगर, शंकरगंजमध्ये माकडांची दहशत

विशेष म्हणजे, सिटी चौक पोलिस ठाण्यातून बाहेर पडताच हल्लेखोरांनी खान यांच्यावर रॉड, लाठ्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना घाटीत दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्या डोक्यावर १० टाके पडले आहेत.

रफत यार खान हे गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास काही कामानिमित्त सिटी चौक पोलिस ठाण्यात गेले होते. तेथून बाहेर पडल्यानंतर जुना बाजार भागात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक झडप घातली. लोखंडी रॉडचा वापर केल्याने खान रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.

Sambhajinagar Crime News |
Beed Armed Robbery : खळवट निमगावमध्ये सशस्त्र दरोडा

या घटनेमुळे परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. जुने राजकीय वैमनस्य आणि राजकीय वर्चस्व यातून हा संघर्ष टोकाला गेल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news