Monkey terror in Nanded| धर्माबादमधील साईनगर, शंकरगंजमध्ये माकडांची दहशत

सात वर्षीय चिमुकलीवर हल्ला, निजामबादला हलविले
Monkey terror in Nanded| धर्माबादमधील साईनगर, शंकरगंजमध्ये माकडांची दहशत
Published on
Updated on

धर्माबाद: शहरातील शंकर गंज साईनगर परिसरात माकडांचा वाढत्या उपद्रवामुळे आता थेट जीवावर बेतणारे वळण घेतले आहे शंकर गजमध्ये अंगणात खेळणाऱ्या तेजस्वी इरण्णा गोरेकर (वय - सात, इयत्ता- दुसरी) हिच्यावर माकडाने अचानक झडप घालून हाताच्या दंडाला चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संताप उसळला आहे.

प्रत्यक्ष दर्शनी ने सांगितले आहे की, दुपारच्या सुमारास छतावरून आलेल्या माकडाने क्षणार्धात तेजस्वीर हल्ला केला. मुलीच्या किंकाळ्याने घरातील व शेजारील मंडळी धावून आली. नागरिकांनी काठी व दगडाच्या साह्याने माकडाला हुसकावून लावले मात्र तोपर्यंत तेजस्वीच्या हाताला खोल जखम झाली होती. तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमेचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी तिला निजामबादला हलविण्याचा सल्ला दिला. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

या घटनेनंतर शंकर गंज व साईनगर मध्ये नागरिक भयभीत झाले आहेत. आता माकडे थेट महिला, वृद्ध व लहान मुलावर हल्ले करत आहेत. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास प्रशासन जागे होणार का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. अनेक कुटुंबांनी खिडक्या दारे बंद ठेवण्यास सुरुवात केली असून लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडणे धोकादायक बनले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही माकडाकडून घरात घुसखोरी करून अन्नपदार्थ पळवणे छपरावरील व छतावरील पाण्याच्या टाकीचे नुकसान करणे वृद्धांवर झडप घालने अशा घटना वारंवार घडले आहेत. मात्र चिमुकलीवर झालेल्या हल्ल्यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी नगरपरिषद व वनविभागाकडे तातडीने माकड पकड मोहीम राबवून सुरक्षित पुनर्वसन करण्याची जोरदार मागणी केली आहे.

ठोस उपाय न झाल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. चौकट: पूर्वीही हल्ले आताही हल्ले; कारवाई कधी? शंकर गंज साईनगर भागात माकडाकडून चावा घेण्याच्या घटना या आधीही घडले आहेत घरात घुसखोरी अन्नपदार्थ पळविणे छपरावर छतावरील पाण्याच्या टाकीचे नुकसान वृद्धावर झडप घालणं असे प्रकार सुरूच आहेत. मात्र वारंवार तक्रारी करूनहीठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news