Digital Arrest : माजी बीएसएनएल कर्मचारी ४५ दिवस डिजिटल अरेस्ट

सायबर भामट्यांनी ४३ लाख रुपये उकळले. रक्कम फ्रीज होऊ नये म्हणून पुन्हा ८ दिवस ठेवले खेळवत ; मुकुंदवाडी पोलिसांत गुन्हा दाखल.
Digital Arrest
Digital Arrest : माजी बीएसएनएल कर्मचारी ४५ दिवस डिजिटल अरेस्टfile photo
Published on: 
Updated on: 

Former BSNL employee under 'digital arrest' for 45 days

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : तुमच्या नावाच्या सिमकार्डवरून बेकायदेशीर मेसेज पाठवले गेले आहेत. नरेश गोयल मनी लॉड्रिग प्रकरणात तुमचे नाव आले असून तुमच्या नावाचे एटीएम कार्ड सापडले आहे, अशी भीती दाखवून एका ४६ वर्षीय माजी बीएसएनएल कर्मचाऱ्याला सायबर भामट्यानी तब्बल ४५ दिवस डिजिटल अरेस्ट ठेवत तब्बल ४३ लाख ४० हजार रुपये उकळले. बनावट पोलिस, बनावट कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे खोटे पत्र पाठवून ही फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ५ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर या दरम्यान एन-२ सिडको परिसरात घडला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.२२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Digital Arrest
HPV Vaccination : एचपीव्ही लसीकरणासाठी मनपाची जनजागृती मोहीम

योगेश (४६, रा. एन-२ सिडको) यांच्या तक्रारीनुसार, ते बीएसएनएलमध्ये काम करत होते सध्या घरीच असतात. ५ सप्टेंबर रोजी सकाळी एका अनोळखी क्रमांकावरून त्यांना कॉल आला. ट्रायमधून बोलत असल्याचे भासवले. तुमच्या नावाचे दिल्लीत घेतलेले सिमकार्ड बेकायदेशीर मेसेजसाठी वापरले गेले असून, दिल्लीतील दर्यागंज पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल झाला आहे. दोन तासांत दिल्लीला हजर व्हा, अन्यथा सर्व नंबर बंद होतील, अशी धमकी दिली.

त्यानंतर व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल करण्यात आला. त्या कॉलवर समोर दिल्ली पोलिसांच्या गणवेशात एक व्यक्ती बसलेली होती आणि पाठीमागे दिल्ली पोलिसांचे अधिकृत चिन्ह दिसत होते. त्याने कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या बहाण्याने तक्रारदाराची माहिती घेतली आणि तुमचे नाव जेट एअरवेजचे नरेश गोयल यांच्या कोट्यवधींच्या मनी लाँड्रिंग घोटाळ्यात आले असून, त्यांच्या घरी तुमच्या नावाचे कॅनरा बँकेचे एटीएम सापडले आहे, असा खोटा आरोप लावला.

Digital Arrest
Gunthewari : गुंठेवारीसाठी आता अखेरचे आठ दिवस

जंतरमंतरवर कारवाईची थाप; डीपी बदलला अन् डोळे उघडले

१५ ऑक्टोबरला योगेश यांना भामट्याने कॉल करून तुमचे पैसे करण्यासाठी आणखी ४ दिवस लागतील असे सांगितले. १९ ऑक्टोबरला योगेश यांनी कॉल केला तेव्हा भामट्याने दिल्लीत जंतरमंतरवर कारवाई सुरू आहे, आणखी ५ दिवस लागतील, अशी बतावणी केली. मात्र, २० ऑक्टोबर रोजी आरोपींच्या व्हॉट्सअॅप डीपीवरून दिल्ली पोलिसांचा लोगो गायब झाल्याचे पाहून फसवणूक झाल्याचे योगेश यांच्या लक्षात आले. अधिक तपास पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे करत आहेत.

व्हिडिओ कॉलवर २४ तास निगराणी

६ सप्टेंबर रोजी विजय खन्ना आणि राहुल गुप्ता यांनी फिर्यादीला आयएमओ अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले असून, तुमच्यावर २४ तास निगराणी ठेवली जात आहे, असे धमकावून ६ सप्टेंबर ते ९ सप्टेंबरपर्यंत त्यांना सतत व्हिडिओ कॉलवर डांबून ठेवण्यात आले.

सिक्रेट खात्यात वर्ग करवून घेतले ४३.४० लाख रुपये

फिर्यादी प्रचंड घाबरल्याचे पाहून भामट्यांनी त्यांना आरबीआयच्या सिक्रेट सुपरव्हिजन खात्यात पैसे सुरक्षित तपासासाठी वर्ग करा, चौकशी पूर्ण झाल्यावर ४ ते ५ दिवसांत सर्व रक्कम परत मिळेल, असा विश्वास दिला. त्यानुसार तक्रारदाराने मुदत ठेव मोडून व खात्यांतील शिल्लक रकमेतून पैसे पाठवले. २९ सप्टेंबर : बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातून २२ लाख रुपये (येस बँक, कोझिकोड, केरळ). १ ऑक्टोबर : ५ लाख रुपये (येस बँक, जमखंडी).३ ५ ऑक्टोबर : इतर बँकांतील शिल्लक जमा करून ८ लाख रुपये (कोटक महिंद्रा बँक, उत्तम नगर, दिल्ली). १२ ऑक्टोबर : उर्वरित ८ लाख ४० हजार रुपये (बँक ऑफ इंडिया, गोले का मंदिर). अशा रीतीने वेगवेगळ्या तारखांना तक्रारदाराकडून तब्बल ४३ लाख ४० हजार रुपये उकळण्यात आले.

संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करण्याची धमकी

९ सप्टेंबर रोजी एक बनावट ऑनलाईन कोर्टाचा सेटअप तयार करून कॉल तिथे जोडण्यात आला. त्यामध्ये, नरेश गोयल यांच्यासोबत झालेल्या संभाषणातील आवाज तुमच्याशी मॅच होत आहे, असे सांगून त्यांना थेट सर्वोच्च न्यायालयाचे बनावट पत्र पाठवण्यात आले. तुमची सर्व खाती व मालमत्ता सील केली जाईल, अटक झाल्यास मुलाचे शिक्षण व पत्नीची समाजात बदनामी होईल, अशी भीती घालून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news