Gunthewari : गुंठेवारीसाठी आता अखेरचे आठ दिवस

३१ ऑक्टोबर अंतिम मुदत : शनिवार, रविवार विभाग राहणार सुरू
Sambhajinagar News
Sambhajinagar News : गुंठेवारीसाठी आता शेवटची संधी, ३१ ऑक्टोबरनंतर कारवाईfile photo
Published on: 
Updated on: 

Only eight days left for 'Gunthewari' (regularization of land plots)

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गुंठेवारी नियमितीकरणासाठी आठ दिवसांचा अवधी उपलब्ध आहे. महापालिकेकडे आतापर्यंत ९,७४६ संचिका प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ४,७३२ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबर ही अंतिम मुदत जवळ आल्याने उर्वरित प्रक्रियेला वेग देण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. शनिवार आणि रविवारीही कार्यालय सुरू राहणार असून, पुढील आठ दिवस नगररचना विभागात कामकाज सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी (दि.२३) मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Sambhajinagar News
Devasthan Plotting Case : देवस्थान प्लॉटिंग प्रकरणात होईना गुन्हा दाखल

गुंठेवारी नियमितीकरणासाठी महापालिकेकडून ३१ ऑक्टोबर ही शेवटची मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे शुक्रवारी आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अद्याप नियमितीकरणाची प्रक्रिया पूर्ण न केलेल्या नागरिकांसाठी आता अखेरची संधी उपलब्ध आहे.

महापालिकेने गुंठेवारी नियमितीकरणासाठी सवलत योजना जाहीर केली. त्यानंतर १५ जुलैपासून २३ ऑक्टोबरपर्यंत नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. या कालावधीत ९,०३९ संचिका दाखल झाल्या असून ४,८०० हून अधिक प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यातून महापालिकेच्या तिजोरीत ८४ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

दरम्यान, महापालिकेने शेवटच्या टप्प्यात अर्ज प्रक्रिया आणि प्रस्तावांच्या मंजुरीवर लक्ष केंद्रित केले आहे. या प्राप्त संचिकांची छाननी करून पात्र प्रस्तावांना मंजुरी देण्याची कार्यवाही सुरू आहे. अंतिम मुदतीत नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिका कार्यालय शनिवार आणि रविवारीही सुरू ठेवण्यात येणार आहे.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : ओल्या कचऱ्यातून गॅस निर्मिती, मनपा देणार बीपीसीएलला जागा

बँकेकडूनही काउंटरची संख्या वाढविण्यात आली असून, पैसे भरण्यासाठी क्यूआर कोडची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर पुढील आठ दिवस नगररचना विभाग सुरू ठेवून संचिकांवरील कार्यवाही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.

ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक संचिका

गुंठेवारी नियमितीकरणासाठी जुलैमध्ये ३१४, ऑगस्टमध्ये १,३००, सप्टेंबरमध्ये ३,५०० आणि ऑक्टोबरमध्ये सुमारे ४,००० संचिका दाखल झाल्या. एप्रिलपासून ९,७४६ संचिका प्राप्त झाल्या असून, ४,७३२ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. आतापर्यंत २१ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

त्याच भागात खर्चाचा विचार

गुंठेवारी नियमितीकरणातून जमा होणारा निधी विकासकामांसाठी वापरण्याबाबत महापालिका प्रशासन ज्या भागातून नियमितीकरणाच्या संचिका प्राप्त झाल्या आहेत, त्याच भागातील विकासकामांवर हा निधी खर्च करण्याचा विचार असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news