Crime News : आधी रिक्षा चोरली, मग चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न

शहागंजच्या घटनेतील आरोपीच्या मागावर गुन्हे शाखा अन् सिटी चौक पोलिसांची पथके
Crime News |
Crime News : आधी रिक्षा चोरली, मग चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्नPudhari File Photo
Published on
Updated on

First stole a rickshaw, then attempted to kidnap a little girl

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहागंज बाजारपेठेतून १० वर्षीय चिमुकलीचे अपहरण आणि सुटकेच्या थरारक प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या रिक्षाच्या (एमएच २० ईएफ ४४२८) क्रमांकावरून मूळ मालकाचा शोध घेतला असता, अपहरणाच्या घटनेपूर्वी अवघ्या एक तास आधी ही रिक्षा महापालिकेसमोरून चोरीला गेल्याची कबुली रिक्षा मालकाने दिल्याने पोलिसही चक्रावले आहेत.

या माहितीची पडताळणी करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. दरम्यान, त्या सराईत आरोपीने आधी रिक्षा चोरली आणि त्यानंतरच या चिमुकलीचे अपहरण केल्याचे प्राथमिकदृष्ट्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्याआधारे गुन्हे शाखा आणि सिटी चौक पोलिसांनी आरोपीचा कसून शोध सुरू केला आहे.

Crime News |
Ration Racket : कुरेशीच्या रेशन रॅकेटमध्ये अग्रवाल कनेक्शन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाबाजार येथे राहणारे ५१ वर्षीय व्यक्ती बुधवारी (दि. २२) रात्री चेलीपुरा भागात दुरुस्तीसाठी दिलेला टीव्ही पाहण्यासाठी निघाले होते. जाताना त्यांनी आपल्या १० वर्षांच्या मुलीला शहागंजमध्ये भाजीपाला विक्री करणाऱ्या एका नातेवाइकाकडे सोडले आणि 'मी परत येईपर्यंत हिला सांभाळा,' असे सांगितले.

त्यानंतर नातेवाइकाने या चिमुकलीला काही पैसे देऊन खाऊ (कुरकुरे) आणण्यासाठी पाठवले. खाऊ आणण्यासाठी जात असतानाच एका रिक्षाचालकाने या चिमुकलीला गाठले. 'तुझी आंटी माझ्या ओळखीची आहे,' असे म्हणत त्याने तिच्या हातात १०० रुपये टेकवले आणि 'चल, आपण खाऊ आणू' ते आमिष दाखवून तिला रिक्षात बसवून पळवून नेले. मात्र सतर्क नागरिकांनी केलेल्या थरारक पाठलागामुळे आणि नालीत रिक्षा अडकल्याने आरोपीने पळ काढला आणि चिमुकलीची सुखरूप सुटका झाली. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News |
Water Pipeline Leak : सिडकोच्या वाढीव पाणीपुरवठ्याला पहिल्याच दिवशीच गळतीचे ग्रहण

पोलिस आयुक्तांकडून गंभीर दखल

बाजारपेठेतून लहान मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेची पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्या सूचनेवरून आता गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सिटी चौक पोलीस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी, उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, राहुल शिंदे यांची विशेष पथके आरोपीचा शोध घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा माग काढला जात आहे. तसेच, सुखरूप सुटका झालेल्या चिमुकलीने केलेल्या वर्णनावरून तिला रेकॉर्डवरील विविध संशयित आरोपींचे फोटो दाखवून मुख्य आरोपीची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news