Water Pipeline Leak : सिडकोच्या वाढीव पाणीपुरवठ्याला पहिल्याच दिवशीच गळतीचे ग्रहण

पिरॅमिड चौकातील जुन्या जलवाहिनीला गळती : एन-५ जलकुंभाकडे सुरू झालेला पुरवठा चार तासांतच बंद
Water Pipeline Leak
Water Pipeline Leak : सिडकोच्या वाढीव पाणीपुरवठ्याला पहिल्याच दिवशीच गळतीचे ग्रहणfile photo
Published on
Updated on

Water Pipeline Leak: CIDCO increased water supply on the first day itself

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सिडकोच्या वाढीव पाणीपुरवठ्याला पहिल्याच दिवशीच गळतीचे ग्रहण लागले असून, शहराच्या ६०० नवीन पाणीपुरवठा योजनेतील एन-५ येथील जलकुंभ क्रमांक २ आणि ३ मध्ये प्रथमच पाणी पोहोचविण्याचा महापालिकेचा प्रयत्न अवघ्या चार ते पाच तासांतच विस्कळीत झाला. १५०० मिमीच्या नव्या जलवाहिनीतून पाणी जलकुंभापर्यंत नेताना वापरण्यात येणाऱ्या मिमी जुन्या जलवाहिनीला टाऊन सेंटर परिसरातील पिरॅमिड चौकात गळती लागल्याने बुधवारी (दि.२२) रात्री एन-५ जलकुंभाकडे सुरू झालेला पुरवठा अवघ्या चार तासांतच बंद करावा लागला. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने सुरू झालेल्या नव्या योजनेला सुरुवातीलाच अडथळा निर्माण झाला आहे.

Water Pipeline Leak
Ration Racket : कुरेशीच्या रेशन रॅकेटमध्ये अग्रवाल कनेक्शन

नवीन योजनेअंतर्गत जायकवाडी धरणातील पाणी २५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीद्वारे नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जात आहे. तेथून १५००, ११०० आणि २००० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांच्या माध्यमातून शहरातील विविध जलकुंभांपर्यंत पाणी पोहोचविण्याचे नियोजन आहे. यापैकी १५०० मिमी जलवाहिनीची चाचणी यशस्वी झाली. त्यानंतर एन-५ येथील जलकुंभ क्रमांक २ आणि ३ मध्ये प्रथमच पाणी सोडण्यात आले. संबंधित भागात काही काळ पाणीपुरवठाही करण्यात आला.

या पार्श्वभूमीवर शहरात नवीन योजनेचे पाणी पोहोचल्याचा दावा करत या भागातील नगरसेवकांसह त्यांच्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मात्र जलकुंभांपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी जोडण्यात आलेल्या ६०० मिमी जुन्या जलवाहिनीला पिरॅमिड चौकात गळती लागल्याचे काही तासांतच निदर्शनास आले. त्यामुळे सायंकाळी सुरू झालेला पुरवठा रात्री सुमारे दहा वाजता थांबविण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, या कालावधीत केवळ दोन ते तीन एमएलडी पाणीच जलकुंभांमध्ये साठविले गेले. गळतीची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरच पुन्हा पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

Water Pipeline Leak
Digital Arrest Scam : १८ दिवस डिजिटल अरेस्ट; वृद्धेला १२ लाखांचा गंडा

जुन्या जलवाहिनीवरच भर

नवीन १५०० मिमी जलवाहिनी कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र जलकुंभांपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी अद्यापही ६०० मिमीच्या जुन्या जलवाहिनीचाच वापर करावा लागत आहे. याच जलवाहिनीला गळती लागल्याने नवीन योजनेच्या प्रारंभीच अडथळा निर्माण झाला असल्याने महापालिकेला चांगलीच धावपळ करावी लागली.

दिवसभर दुरुस्तीची धावपळ

गळतीची माहिती मिळताच बुधवारी रात्री जलकुंभाकडे जाणारा पुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर गुरुवारी (दि.२३) सकाळपासून टाऊन सेंटर येथील पिरॅमिड चौकात जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू करण्यात आले. जलवाहिनीतील गळतीचे नेमके ठिकाण शोधून दुरुस्तीचे काम दिवसभर सुरू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news