३६ मीटर उंच वॉटर टॉवरमुळे अग्निशमन सेवा बळकट

पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून १५.७८ कोटींची यंत्रणा : उंच इमारतींसाठी दिलासा
sambhajinagar news
३६ मीटर उंच वॉटर टॉवरमुळे अग्निशमन सेवा बळकटfile photo
Published on
Updated on

Fire Services Strengthened by 36-Meter-Tall Water Tower

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरातील वाढत्या उंच सक्षम इमारतींच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन यंत्रणा करण्यासाठी महापालिकेने मोठे पाऊल उचलत ३६ मीटर उंचीचा अत्याधुनिक मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर संच खरेदी केला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सुमारे १५.७८ कोटी रुपयांच्या या यंत्रणेची खरेदी करण्यात आली असून, यामुळे अग्निशमन सेवेला मोठी बळकटी मिळणार आहे.

sambhajinagar news
MSEDCL TOD meter : परिमंडलात २ लाख ग्राहकांना बसवले टीओडी मीटर

महापालिककेकडून शहरात बहुमजली इमारती उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी महापालिकेकडे अशा बहुमजली इमारतींमध्ये आग लागल्यास नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक आधुनिक साधनांची कमतरता होती.

ही गरज ओळखून पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या पुढाकारातून निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यानुसार जर्मन तंत्रज्ञानावर आधारित स्विंग कंपनीची ही अत्याधुनिक यंत्रणा महापालिकेला प्राप्त झाली आहे. या संचामध्ये ३६ मीटर उंचीचा वॉटर टॉवर, १४ हजार लिटर क्षमतेचा वॉटर बाउजर आणि अग्निशमनासाठी विशेष रोबोटचा समावेश आहे. ही यंत्रणा १० ते १२ मजली इमारतींमध्ये लागलेल्या आगीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यास सक्षम ठरणार आहे. तसेच या संचच्या बूमवर बसविण्यात आलेल्या मॉनिटरिंग कॅमेरा, फायबर ऑप्टिक प्रणाली व थर्मल कॅमेऱ्यामुळे आगीचे अचूक निरीक्षण शक्य होणार आहे.

sambhajinagar news
Water Tanker : मनपातील खासगी टँकरदारांना उन्हाळ्यापूर्वीच आले अच्छे दिन

त्यामुळे ऑपरेटरला तळमजल्यावरूनच नियंत्रण पॅनेलच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविता येणार असल्याने अग्निशमन कर्मचाऱ्यांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तसेच रोबोटच्या मदतीने आग विझविण्याचे काम अधिक जलद व सुरक्षितरीत्या करता येणार आहे. यासह बाउजरमुळे सातत्याने पाणीपुरवठा होऊन कार्यक्षमता वाढणार आहे. ही यंत्रणा नुकतीच प्राप्त झाली असून, लोकार्पणानंतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष वापर सुरू केला जाणार आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे शहरातील अग्निशमन सेवा अधिक सक्षम व परिणामकारक होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

रोबटच्या मदतीने आग विझवण्याची सुविधा या गाडीच्या माध्यमातून १२ व्या मजल्यापर्यंतची आग आटोक्यात आणणे शक्य होणार असून, वरील वाजूला कॅमेरा असल्याने अचूक आगीचे ठिकाण शोधून पाण्याचा मारा करता येणार आहे. तसेच पाण्याचा साठा मोठा असणार असून, यासोबतच रोबटही असणार आहे. रोबट आगीजवळ जाऊन आग विझवण्यास मदत होणार आहे.
अमोल कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, मनपा .

काय होणार फायदा?

उंच इमारतींमधील आगीवर जलद नियंत्रण

कर्मचाऱ्यांचा धोका कमी अचूक निरीक्षणामुळे कार्यक्षमतेत वाढ

आपत्कालीन प्रतिसाद अधिक प्रभावी ठरणार आहे.

यंत्रणेची वैशिष्ट्ये

३६ मीटर उंचीचा वॉटर टॉवर

१४,००० लिटर क्षमतेचा बाउजर

थर्मल कॅमेरा व फायबर ऑप्टिक प्रणाली

अग्निशमनासाठी विशेष रोबोट.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news