Sambhajinagar News : लाखभर वाहनधारकांकडे ४४ कोटी ४६ लाखांचा दंड प्रलंबित

दंड भरा अन्यथा शनिवारी लोक अदालतीत हजर व्हा
Sambhajinagar News
Sambhajinagar News : लाखभर वाहनधारकांकडे ४४ कोटी ४६ लाखांचा दंड प्रलंबित File Photo
Published on
Updated on

Fines of Rs 44.46 crore pending against lakhs of vehicle owners

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांनी दंडाची कारवाई केली. मात्र ऑनलाईन दंडाच्या पावत्या देऊनही १ लाख वाहनधारकांनी तब्बल ४४ कोटी ४६ लाखांचा दंड अद्यापही भरलेला नसल्याचे समोर आले आहे. गेल्या महिनाभरापासून वाहनधारकांना दंड भरण्याच्या सूचना केल्या आहेत.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : कामगार मंडळाकडून दीड लाख लाभार्थीना 'भांडी संच'चे वाटप

तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे शनिवारी लोकअदालतीमध्ये हजर राहण्यास कळविण्यात आल्याचे सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांनी गुरुवारी (दि.११) सांगितले. अधिक माहितीनुसार, राज्यात वन स्टेट वन ई-चलानअंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ई-चलान मशीनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येते. मात्र वाहनधारक दंड वेळेवर भारत नसल्याने प्रलंबित ई-चलानची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

त्यामुकले दंडाची वसुली करण्यासाठी शनिवारी महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरण सेवा व उच्च न्यायालय, मुंबई यांच्या समन्वयाने शनिवारी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

Sambhajinagar News
Siddhartha Udyan : सिद्धार्थ उद्यानात घटस्थापनेच्या मुहूर्तावर होणार सिंहाचे आगमन

ज्यांच्याकडे दंड प्रलंबित आहे, त्यांनी शनिवारपूर्वी भरणा करावा, अन्यथा त्यांच्यावर न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल, असे एसीपी भुजंग यांनी पत्रकात म्हटले आहे.

इथे भरता येईल दंड

वाहतूक पोलिसांच्या ई-चलान मशीनवर, ऑनलाईन, वेबसाईट तसेच महा ट्राफिक अॅपवरही दंडाची रक्कम भरता येते. तसेच नोटीसच्या शेवटच्या पानावर तडजोड रक्कम, दंड रक्कम भरण्यासाठी लिंक देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news