

Female accused who escaped from police custody, accomplices arrested
वाळूज, पुढारी वृत्तसेवा : एमआयडीसी अंधेरी (पूर्व) मुंबई पोलिस ठाण्याच्या कस्टडीतून पळून गेलेल्या एका महिला आरोपीसह तिच्या तीन महिला साथीदारांना वाळूज पोलिसांनी शिवराई भागातून अटक करून मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले. सदरची कारवाई शनिवारी (दि.८) नोव्हेंबर रोजी करण्यात आली.
याविषयी पोलिसांनी की, एमआयडीसी पोलिस स्टेशन अंधेरी (पूर्व), मुंबई येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात महिला आरोपी दिव्या रवी काळे (३२, रा. शिंधी शिरसगाव, ता. गंगापूर) हीस ६ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. परंतु ती पोलिस कस्टडीमधून पळून गेल्याने तिच्यावर कलम २६२ बीएनएस अन्वये शुक्रवारी ७ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
पळालेली सदरची महिला ही वाळ-जलगतच्या शिवराई भागात लपलेली असल्याची माहिती वाळूज पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वाळूज पोलिसांसह एमआयडीसी पोलिस ठाणे अंधेरी (पूर्व), मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे शिवराई भागात तिचा शोध सुरू केला. त्यात आरोपी दिव्या रवी काळे ही ईस्टवेस्ट कंपनी समोरील एका मोकळया शेतात पोलिसांना अलगद मिळून आली.
पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता सदर महिला आरोपीने साथीदार माहिलांविषयी माहिती दिली. गुन्ह्याची कबुली देत तिच्या साथीदार महिला आरोपी अश्विनी पोपट पवार (४०, रा. शिवराई, वाळूज), अर्चना रामा काळे (४५, रा. अविनाश कॉलनी, वाळूज), सीमा जॉन्सन पवार (२०, रा. शिवराई, हनुमान मंदिर रोड, वाळूज), अशी नावे सांगितली. त्यावरून पोलिसांनी उर्वरित महिला आरोपींनाही ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे, उपनिरीक्षक अजय शितोळे, संदीप वाघ, पो.अं. विजय पिंपळे, नितीन धुळे, श्रीकांत सपकाळ, पोलिस मित्र किशोर गाडेकर आदींनी केली आहे.