FDA : नवरात्रोत्सवात एफडीएची धडाकेबाज कारवाई

ऐन नवरात्रोत्सवात एफडीएकडून अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू आहे.
sambhajinagar news
नवरात्रोत्सवात एफडीएची धडाकेबाज कारवाईfile photo
Published on: 
Updated on: 

FDA’s swift and decisive action during the Navratri festival

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ऐन नवरात्रोत्सवात एफडीएकडून अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू आहे. यात कांचनवाडी इंडिया' येथील 'झेप्टो' आणि वाळूज एमआयडीसीतील 'सोडेक्सो तसेच वडगाव कोल्हाटी येथील तेल रिपॅकिंग युनिट 'ज्योतिर्लिंग फूड्स' या तिन्ही आस्थापनांचे अन्न परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. या तिन्ही कारवाई मागील आठ दिवसांत केलेल्या आहेत.

sambhajinagar news
Sambhajinagar News : बजाजनगरातील दूध डेअरीला आग; लाखोचे नुकसान

राज्यात अन्न व औषध विभागाकडून सेफ फूड, सेफ महाराष्ट्र या मोहिमेंतर्गत खाद्यअन्न पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी धडाकेबाज कारवाई सुरू आहे. याअंतर्गत कांचनवाडी, पैठण रोड येथील 'झेप्टो लिमिटेड'च्या गोदामात (वितरक व साठवणूक केंद्र) अन्न सुरक्षा अधिकारी पी. पी. सुरसे यांनी ७ऑक्टोबर २०२६ रोजी अचानक तपासणी केली.

या तपासणीत शीतगृह व्यवस्थेत निकष पाळले जात नव्हते. अन्नपदार्थ थेट जमिनीवर व भिंतीला लागून ठेवलेले होते. गंजलेले व तुटलेले रॅक, धूळ, घाण, कोळिष्टके आणि कचरा व्यवस्थापनाचा अभाव आढळला. कीड नियंत्रणाचे उपाय नव्हते. एमआयडीसी वाळूज येथील 'मेसर्स सोडेक्सो इंडिया सर्व्हिसेस प्रा. लि.' ला सुधारणा नोटीसनंतर १२ ऑक्टोबर फेरतपासणीत अनेक गंभीर त्रुटी कायम असल्याचे आढळले. त्यामुळे दोन्ही आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले.

sambhajinagar news
Sambhajinagar News : देवाची ४१ एकर जागा विकणाऱ्यांना अभय कोणाचे ?

ज्योतिर्लिंग फूड्स'मधून लाखोंचे खाद्यतेल जप्त

वाळूज (वडगाव कोल्हाटी) येथील 'मेसर्स ज्योतिर्लिंग फूड्स प्रायव्हेट लिमिटेड' या वनस्पती तेल रिपॅकिंग व प्रक्रिया कारखान्यातून तब्बल २६.७८ लाखांचा १३ हजार ७११ किलो तेल साठा जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. कुचेकर यांच्या पथकाने मंगळवारी ही कारवाई केली. या कंपनीच्या तपासणीत पथकाला अनेक त्रुटी आढळल्या. यात तेल साठवणुकीसाठी नियमानुसार सुरक्षित साहित्याऐवजी थेट लोखंडी टाक्यांचा वापर सुरू होता.

कीटक प्रतिबंधक जाळ्यांचा अभाव, अंतर्गत भिंती व जमिनीची अयोग्य रचना. अन्न सुरक्षा चाचणी व पाणी तपासणी अहवाल उपलब्ध नसणे. पॅकेजिंगसाठी 'फूड ग्रेड' नसलेले साहित्य वापरणे आणि कामगारांच्या वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव होता. यामुळे सहायक आयुक्त (अन्न) द. वि. पाटील यांनी निलंबन आदेश जारी केले. या निलंबन काळात व्यवसाय सुरू ठेवल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news