Sambhajinagar News : आंदोलनात अश्लील वाक्यांचे फलक, विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

नीट परीक्षेच्या गोंधळाव िरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील क्रांती चौकात पुकारण्यात आलेल्या आंदोलनात अश्लील वाक्ये असलेले फलक झळकावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
sambhajinagar news
Sambhajinagar News : आंदोलनात अश्लील वाक्यांचे फलक, विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखलFile Photo
Published on
Updated on

Case registered against students for placards with obscene language during protest

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नीट परीक्षेच्या गोंधळाव िरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील क्रांती चौकात पुकारण्यात आलेल्या आंदोलनात अश्लील वाक्ये असलेले फलक झळकावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या आंदोलनात शासन आणि नेत्यांना उद्देशून इंग्रजीत अत्यंत अश्लील वाक्य (शिव्या) असलेले फलक झळकावणाऱ्या दोन अज्ञात विद्यार्थ्यांवर (एक मुलगा आणि एक मुलगी) क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sambhajinagar news
Kidnapping youth : वाळूच्या कमिशनवरून रिक्षा अडवून तरुणाचे अपहरण

अधिक माहितीनुसार, 'नीट' परीक्षेतील गैरव्यवहाराच्या निषेधार्थ आणि दिल्लीतील आंदोलनाला बळ देण्यासाठी सोमवारी (दि.२०) क्रांती चौकात विविध विरोधी पक्ष, विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थ्यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या गर्दीत सहभागी झालेल्या दोन अनोळखी विद्यार्थ्यांनी हातात एक फलक पकडला होता.

या फलकावर शासन, राजकीय नेते आणि तिथे जमलेल्या लोकांना उद्देशून इंग्रजी भाषेतील अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह वाक्य लिहिलेली होती. या आंदोलनाच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. यात महिला पोलिस अधिकारी आणि अंमलदारही कर्तव्यावर होत्या.

भर चौकात विद्यार्थ्यांच्या हातातील हा अश्लील फलक पाहून बंदोबस्तावरील महिला पोलिसांना धक्का बसला. याप्रकरणी कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलिस अंमलदाराने तक्रारीत म्हटले आहे की, या अश्लील फलकामुळे एक महिला म्हणून त्यांच्या आणि बंदोबस्तावरील अन्य महिला पोलिसांच्या मनात लज्जा उत्पन्न झाली आहे.

sambhajinagar news
“ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस” लिहिणार्‍या संत बहिणाबाई या छत्रपती संभाजीनगरच्या...

या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिसांनी त्या दोन्ही अज्ञात विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार गावंडे करत आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news