FDA Raid Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात मोठी कारवाई : २.९३ कोटींच्या निकृष्ट खाद्यतेलाचा साठा जप्त

दोन तेल रिपॅकिंग कंपन्यांचे परवाने निलंबित; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
Edible Oil Seized
जिल्ह्यातील दोन तेल रिपॅकिंग कंपन्यांवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली Pudhari
Published on
Updated on

Edible Oil Seized

छत्रपती संभाजीनगर : खाद्यतेलात भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या जिल्ह्यातील दोन तेल रिपॅकिंग कंपन्यांवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. पैठण तालुक्यातील मेसर्स बागारिया ॲग्रो प्रॉडक्ट्स आणि शहरातील लक्ष्मण चावडी येथील मे. बागारिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स प्रा. लि. या कंपन्यांवर टाकलेल्या संयुक्त छाप्यात तब्बल २ कोटी ९३ लाख ३५ हजार ६०३ रुपये किमतीचा संशयित निकृष्ट खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला.

यासोबतच दोन्ही कंपन्यांचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे खाद्यतेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळ करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू आहे.

Edible Oil Seized
Chhatrapati Sambhajinagar crime: क्षुल्लक कारणावरून तरुणावर ब्लेडने प्राणघातक हल्ला; एक जण गंभीर जखमी

त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या महिनाभरात हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ज्यूस सेंटर, पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पांसह विविध आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. आता प्रशासनाने खाद्यतेल उद्योगातील अनियमिततेवर लक्ष केंद्रित केले आहे.

जिल्हा पथकाने शनिवारी (दि. ११) पैठण तालुक्यातील गेवराई तांडा येथील मेसर्स बागारिया ॲग्रो प्रॉडक्ट्स आणि शहरातील अभिनय टॉकीजच्या मागे, लक्ष्मण चावडी परिसरातील मे. बागारिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स प्रा. लि. या दोन्ही ऑईल रिपॅकिंग युनिट्सवर एकाच वेळी छापे टाकले. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आणि अत्यंत अस्वच्छ वातावरणात खाद्यतेलाची रिपॅकिंग सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर १ लाख ९० हजार ६४५.०४ किलो वजनाचा, सुमारे २.९३ कोटी रुपयांचा निकृष्ट खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला.

Edible Oil Seized
Chhatrapati Sambhajinagar Crime : शहरात बाबा फर्जन नावाची होती दहशत

ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त एस. आर. करकळे आणि सहाय्यक आयुक्त डी. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे व पी. एस. कुचेकर यांच्या पथकाने केली.

जप्त करण्यात आलेला साठा

  • रिफाइंड पाम तेल (लूज व टिन) : सुमारे ५९ हजार किलो (किंमत अंदाजे ८७ लाख रुपये)

  • रिफाइंड सोयाबीन तेल (लूज व टाकी) : सुमारे ६८ हजार किलो (किंमत अंदाजे १ कोटी ७ लाख रुपये)

  • रिफाइंड कपाशी तेल (लूज, टिन व टाकी) : सुमारे ६० हजार किलो (किंमत अंदाजे ९७.६० लाख रुपये)

  • अज्ञात वनस्पती तेल : ९९८ किलो (किंमत ९९ हजार ८०० रुपये)

  • एकूण जप्त साठा : १ लाख ९० हजार ६४५.०४ किलो

  • एकूण किंमत : २ कोटी ९३ लाख ३५ हजार ६०३ रुपये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news