Vaijapur Accident : भरधाव हायवाची दुचाकीला धडक, बाप-लेक ठार

आई गंभीर जखमी : वैजापूर रोडवरील घटना
Vaijapur Accident
Vaijapur Accident : भरधाव हायवाची दुचाकीला धडक, बाप-लेक ठारFile Photo
Published on
Updated on

Father and daughter killed in high-speed highwa collision with bike

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा :

हायवा ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील बाप-लेक ठार, तर आई गंभीर जमखी झाली. ही घटना शुक्रवारी (दि. ३) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. हा भीषण अपघात वैजापूर लाडगाव रस्त्यावर रोठे वस्तीजवळ घडला. अय्युब मुनीर शाह (४५) व अश्मिरा अय्युब शाह (१२) अशी मृतांची नावे असून, अय्युब यांची पत्नी अंजुब अय्युब शाह (३५) ह्या गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत उपचार सुरू आहेत.

Vaijapur Accident
Marathwada Vikas Andolan : वसमतच्या गोळीबारामुळे सुरू झाले मराठवाडा विकास आंदोलन

नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथीलअय्युब मुनीर शाह हे आठवडी बाजारात मसाला विक्रीचा व्यवसाय करत होते. मुलीला भेटण्यासाठी ते पत्नी अंजुब व बारा वर्षाची मुलगी अश्मिरा यांना घेऊन श्रीरामपूरला गेले होते. तेथून परतत असताना त्यांच्या दुचाकीला (एम.एच. ४१ ए.आर. ८९५५) लाडगावकडे जाणाऱ्या हायवा ट्रकने (एम. एच. १७ बी.झेड. ९९९१) वैजापूरच्या रोठे वस्तीजवळ जोराची धडक दिली.

त्यामुळे दुचाकीस्वार अय्युब शहा ट्रकखाली चिरडल्याने जागीच ठार झाले मयत झाला. सर्वाना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अश्मिरा व अंजुब यांना प्राथमिक उपचारानंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, अश्मिरा हिचा रुग्णलयात पोहचण्यापूर्वीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जमखींना तातडीने पोलिसांनी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलविले वाहतूक सुरळी केली. हायवा पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास वैजापूर पोलिस करत आहेत.

Vaijapur Accident
Manoj Jarange ...तर १९९४ चा जीआर रद्द करण्याची मागणी करणार : मनोज जरांगे यांचा इशारा

हायवाचालकांची दहशत वाढली

वैजापूर शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे कामे सुरू आहेत, त्यामुळे, खडी मुरूम ओव्हर लोड माल घेऊन जाणारे हायवा चालक बेभानपणे वाहन चालवताना दिसतात, अनेक वेळा छोटे-मोठे अपघात झाल्याने अनेक लोक जखमी देखील झाले आहे. तरी देखील हे हायवा चालक आपली मुजोरी सोडत नाही आणि, त्यामुळे अशा लोकांचा बळी जातो, त्यामुळे या हायवा चालकांची दहशत रोखण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news