Sambhajinagar News : जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी विकासाला गती देणार : आ. संजना जाधव

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत ९८ पैकी ९८ मते; कन्नड तालुक्यात उत्साहात जल्लोष
Sambhajinagar News
Sambhajinagar News : जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी विकासाला गती देणार : आ. संजना जाधवfile photo
Published on
Updated on

Farmers will speed up development through District Bank: MLA Sanjana Jadhav

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी प्रथमच निवडणूक लढविणाऱ्या आमदार संजना जाधव यांनी ९८ पैकी ९८ मते मिळवत दणदणीत विजय मिळविला. त्यांच्या या एकमताने झालेल्या निवडीमुळे कन्नड शहरासह तालुक्यात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटप करून जल्लोष साजरा केला.

Sambhajinagar News
District Bank Elections : जिल्हा बँकेवर महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व

विजयानंतर आमदार संजना जाधव यांनी मतदारांचे आभार मानताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचा कणा असल्याचे सांगितले. बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक कर्जपुरवठा, विविध शासकीय योजनांचा लाभ आणि विकासाभिमुख निर्णय अधिक प्रभावीपणे मिळावेत, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

"या निवडणुकीत मला ९८ पैकी ९८ मते मिळाली. हा माझ्यावर मतदारांनी दाखविलेला विश्वास असून या यशाचे संपूर्ण श्रेय माझ्या मतदारराजाला जाते. माझ्यावर विश्वास ठेवून साथ देणाऱ्या सर्व मतदारांचे मी मनःपूर्वक आभार मानते," असे आ. जाधव यांनी सांगितले. त्यांच्या विजयाची घोषणा होताच शहरासह तालुक्यातील विविध भागांत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला.

Sambhajinagar News
Parbhani News : स्थायी समिती सभेत अधिकाऱ्यांची कोंडी

यावेळी युवानेते आदित्यवर्धन जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. मनोज राठोड, उपसभापती जयेश बोरसे, संचालक साईनाथ आल्हाड, खरेदी-विक्री संघाचे सभापती ज्ञानेश्वर निकम, संचालक रामेश्वर धनकर, प्रविण राठोड, कवडे काका, शिवाजी थेटे, सिद्धेश्वर झाल्टे, किशोर पवार, नगरसेवक प्रकाश पिस्थानी, आदित्य गर्जे, सरपंच रवी राठोड, विक्रम पाटे, रत्नाकर पंडित, प्रदीप बोडखे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news