

Farmers have been waiting for urea for a month
नाचनवेल, पुढारी वृत्तसेवा : नाचनवेल परिसरात खरीप हंगामापासूनच सर्वच ठिकाणी युरियाची टंचाई निर्माण झाली असून, गेल्या एक महिन्यापासून शेतकरी युरिया आहे का? युरिया आला का, असा प्रश्न परिसरातील कृषी विक्रेते यांना विचारत आहेत. मात्र विक्रेतेही वरूनच उपलब्ध नसल्याने आम्ही युरिया देऊ शकत नाही, असे म्हणून नाइलाज असतो शेतकऱ्यांना परत जावे लागत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावर्षी खरीप हंगामात मका, सोयाबीन, तूर या पिकाचे क्षेत्र जास्त वाढले आहे. या पिकांसाठी तालुक्यात युरियासह इतर रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. खतांचे होलसेल घाऊक खतासोबत युरिया खत लिंकिंग करत असल्याचे दिसून येत आहे. याकडे मात्र कृषी विभाग का दुर्लक्ष करत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच आवश्यक असलेल्या युरिया खताची टंचाई निर्माण झालेली आहे. परिणामी युरिया पुरवठ्याची पूर्वतयारी न केल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
खताअभावी पिकाची वाढ खुंटत आहे. कोणत्याही पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे मात्र अर्थात युरियाची आवश्यकता असते. गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील जमिनीचा पोत खालावला असल्याने शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना खताशिवाय पर्याय उरलेला नाही. सद्यस्थितीमध्ये गेल्या एक महिन्यापासून युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. खताचे घाऊक विक्रेते मात्र इतर खतांसोबत युरिया लिकिंग करत असल्याचे दिसून येते. यावर कृषी विभाग का दुर्लक्ष करत आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
सिल्लोड तालुक्यासह बनकिन्होळा परिसरात यंदा कपाशीचा पेरा घटना आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन, मका पिकाची लागवड केली आहे. यामुळे युरीयास रासायनिक खतांची मागणी वाढली आहे. सध्या दोन्ही पिके जोमात आहे. पिकांची चांगली वाढ होण्यासाठी युरीया खताची आवश्यकता मात्र, युरियाची टंचाईची असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अनेक शेतकरी कृषी केंद्रावर खतासाठी चकरा मारत असल्याचे चित्र आहे.
यंदा खताच्या लिकिंगमुळे शेतकऱ्यांना वेळेवर युरिया उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांसह विक्रेत्यांचीही डोकेदुखी वाढली आहे. कृषी विभागाने लवकरात लवकर युरिया खताची उपलब्धता करून देण्याची मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.