Sambhajinagar Encroachment Campaign
अमित मोरे
छत्रपती संभाजीनगर महापालिकेने केंब्रीज चौक ते एपीआय कॉर्नर, महानुभव आश्रम ते नक्षत्रवाडी आणि महानुभव आश्रम ते देवळाई चौक आणि पडेगाव ते दौलताबाद टी पॉइंट या चार प्रमुख रस्त्यांनंतर दिल्लीगेट ते हसूल रस्त्याकडे वक्रदृष्टी केली आहे. कुठे ६० मीटर तर कुठे ४५ व ३५ मीटर रुंदीआड येणाऱ्या बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालविण्यात आला. यात तब्बल ३ हजार ७११ बांधकामे असून, ज्यात गरिबांच्या घरांसह शेकडो व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे. पैपै जमा करून नागरिकांनी बांधलेल्या या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तांची धूळधाण झाली आहे.
केंद्र सरकार एकीकडे बेघर कुटुंबीयांना पीएम आवास योजनेतून हक्काचे घर देत आहे. देशात एकही नागरिक बेघर नसावा, अशी त्यामागची संकल्पना आहे. तर दुसरीकडे महापालिका प्रशासन बेकायदा बांधकामाची मोहीम राबवून अनेकांना हक्काच्या जागेतील घरातून भरपावसात बेघर करीत आहे. ज्या सर्व्हिस रोडच्या नावाखाली महापालिकेने जालना रोडवर एपीआय ते केंब्रीज, पैठण रोड महानुभाव आश्रम ते नक्षत्रवाडी, बीड बायपास रोड महानुभाव आश्रम ते देवळाई चौक आणि दौलाताबाद रोडवर पडेगाव ते शक्तिधाम रस्ता मोकळा केला. त्या सर्व्हिस रोडसाठी भूसंपादन करण्यासाठी महापालिकेकडे निधीच नाही.
त्यामुळे महापालिका केवळ पाडापाडी करून रस्त्याच्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी संरक्षण खांब लावणार आहे. भूसंपादन करून जर महापालिकेला रस्ता तयार करायचाच झाला. तर महापालिकेला किमान १ हजार कोटींचा निधी लागेल.
महापालिकेने ज्या प्रमुख मार्गांवर बेकायदा बांधकामे व अतिक्रमण काढली, त्यातील बहुतांश जागा ही खासगी मालकीची आहे. या मालमत्ता नवीन कायद्यानुसार भूसंपादन करावे लागणार आहे. त्यानुसार बाजार भाव व रेडरिकनर दर यापैकी जो अधिक असेल त्यानुसारच आर्थिक मोबदला द्यावा लागेल. या प्रमुख मागाँवर रेडीरेकनर दर हा किमान ५ ते ८ हजार रुपये चौरस फूट आहे. तर बाजार भाव हा १५ ते २० हजार रुपये चौरस फूट आहे. त्यामुळे भुसंपादनासाठी किमान १ हजार कोटी रुपये लागतील.