

Farmers face new crisis in Kannada taluka, snails are attacking crops
कन्नड, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील शेतकऱ्यांसमोरील संकटे कमी होण्याचे नाव घेत नसून, दरवर्षी एका नवीन संकटाची भर पडत आहे. कधी अवकाळी पाऊस, तर कधी दुष्काळ, मकावर लष्करी अळी, कापसावर बोंडअळी, उसावर लोकरी मावा, भाजीपाला पिकांवर मवा, कोकडा आदी विविध संकटांवर शेतकऱ्यांना मात करावी लागते. त्यात आता शेतकऱ्यांसमोर गोगलगायीचे नवीन संकट घोंगवत आहे.
पूर्वी नदीच्या कडेला आढळणाऱ्या गोगलगायीने शेतात आपले पाय पसरायला सुरुवात केली आहे. कन्नड तालुक्यातील अनेक भागांत गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढला आहे. कापूस, सोयाबीन, भाजीपाला आदी पिकांची कोवळी पाने गोगलगाय कुरतडून टाकत असल्याने पिके बाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. गोगलगायी ही पाने कुरतडतात. तसेच पानांची कडा व मध्यभाग कुरतडतात.
त्यामुळे पानांवर छिद्र पडतात आणि प्रकाशसंश्लेषणावर परिणाम होतो. नवीन रोपे, लहान रोपे, कोवळी रोपे आणि उगवती पाने खाऊन टाकतात, ज्यामुळे झाडे वाढत नाहीत किंवा मरतात. टोमॅटो, भोपळा, वांगी, पालेभाज्यांसारख्या पिकांवर गोगलगायी थेट फळांवर ओरखडे काढतात. ज्यामुळे फळे खराब होत आहेत. गोगलगायी दमट व थंड हवामानात अधिक सक्रिय असल्याने त्यामुळे पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांत त्यांचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो. गोगलगायी त्यांच्या लाळेमुळे आणि चकत्या लावण्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रसार करतात.
गोगलगायींचे प्रकार शेतात आढळून येणाऱ्या गोगलगायी हा एक प्रकारचा मृदुकाय प्राणी असून, तो गॅस्ट्रोपॉड मोलस्का वर्गात मोडतो. शेतात आढळणारी गोगलगाय विशेषतः जमिनीवर राहणारी असते आणि ती वनस्पतीवर उपजीविका भागवत असते. आफ्रिकन गोगलगाय याला जायंट आफ्रिकन लैंड स्नेल असेही म्हणतात. भारतात ही एक आक्रमक प्रजाती मानली जाते. याचा कवच लांबट व टोकदार असतो. ही गोगलगाय अनेक पिकांचे नुकसान करते.
गोगलगायी हाताने गोळा करून संध्याकाळी किंवा सकाळी त्यांना गोळा करून नष्ट करणे. लाकडी राख / चुना / मीठाचा वापर करावा, गोगलगायींना कोरडे वातावरण सहन होत नाही. झाडांभोवती राख, मीठ, किंवा चुना पसरवणे. कार्बनिट किंवा फेरस फॉस्फेट औषधे जैविक किंवा रासायनिक औषधांचा वापर करावा. मात्र हे करताना प्रमाणात व आहेत. काळजीपूर्वक वापरणे. शेतातील बांधावर स्वच्छता करून ओलसर, गवताळ, दाट जागा साफ करून सूर्यप्रकाश पोहोचवणे आदी उपाययोजना करणे गरजेचे आहे.