

Farmers, don't get discouraged, these days too will pass
वरठाण, पुढारी वृत्तसेवा: दुष्काळ परीस्थितीत शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. संकटे येत राहतात.. दुष्काळाचे हेही दिवस जातील संकट काळात कोणत्याही शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलू नये, कुटुंबाचा विचार करावा, असे आवाहन माजी आमदार नामदेवराव पवार यांनी केले. बुधवारी (दि.२८) वरठाण येथे ते बोलत होते.
नामदेवराव पवार यांनी बनोटी सर्कलमधील मोहलाई, वडगाव, किन्ही, वरठाण, शिंदोळ, हनुमंतखेडा, मुखेड, पळाशी, वाडी, तितुर, गोदेंगाव, उप्पलखेडा आदी गावांना भेटी देऊन दुष्काळ परिस्थितीबाबत दौरा करीत शेतकऱ्यांना धीर दिला.
ते म्हणाले की १९७२ पेक्षाही भयंकर दुष्काळ या वर्षी पडला आहे. आतापासून पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जनवरांना अशा चारादेखील शिल्लक नाही. पिके पाण्याअभावी वाळून गेली असून शेतीसाठी लागलेला खर्च देखील निघणे अवघड झाला आहे. दुष्काळात दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. परिस्थितीत शेतकऱ्यांनी धीर सोडू नये.
काही दिवसांत हे संकट देखील निघून जाईल. याप्रसंगी काँग्रेस कमिटीचे सोयगाव तालुका उपाध्यक्ष बाळू खंडाळे, काशीनाथ मोरे, रउफ शेख, विजयसिंग सोळंके, सुनील सोळंके, पन्नालाल जैन, सर्जेराव जंजाळ, रंगनाथ जंजाळ, समाधान राकडे, विनोद माने, प्रभाकर तायडे, शिवाजी कहऱ्हाळे, पोपट लोखंडे, विकास शिंदे, प्रल्हाद गवळी, अनिल गायकवाड, विनोद राठोड, ज्ञानेश्वर गोराडे, अली बिसमिल्ला शहा, पंडित शेळके, शेतकरी उपस्थित होते.