Chhatrapati Sambhajinagar : शेतकऱ्याला तिघांनी चाकूने वार करून लुटले

जाधवमंडी येथील घटना : मोपेडवर जबरदस्तीने बसवून दूरवर नेले; आरडाओरड केल्याने झाली सुटका
Sambhaji Nagar Crime News
Chhatrapati Sambhajinagar News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या जेवणावर अधिकाऱ्यांचा डल्लाFile photo
Published on
Updated on

Farmer robbed by three men after stabbing him with a knife

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : तू शेतकरी है, हमको कम भाव में भाजीपाला खरेदी करके दे, असे म्हणत दुचाकीवर आलेल्या तिघांनी शेतकऱ्याचे अपहरण करून मारहाण केली. चाकूने बरगडीवर वार करून खिशातून ५० हजार लुटून नेले. ही घटना रविवारी (दि.२२) मध्यरात्री सव्वाएक ते दोन वाजेच्या सुमारास जाधववाडी मंडी, मुख्य द्वार ते मोंढा ऑफिसदरम्यान घडली.

Sambhaji Nagar Crime News
Sambhajinagar Crime News : भररस्त्यात लूटमार, भाईगिरी करत चाकूहल्ला

फिर्यादी प्रदीप गणपत जाधव (२८, रा. सफियाबादवाडी, शिऊर, ता, वैजापूर) यांच्या तक्रारीनुसार, ते आठवडी बाजारात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. जाधववाडी मोंढा येथे दोन दिवसांआड ते भाजीपाला खरेदीसाठी येत असतात. रविवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास ते आंबेडकर चौक येथे आले.

मंडीकडे ते रस्त्याने पायी जात होते. त्यांनी भाजीपाल्यासाठी ५० हजार रुपये आणलेले पॅन्टच्या खिशात ठेवले होते. मुख्य गेटसमोर येताच त्यांच्याजवळ मोपेडवर २० ते ३० वयोगटातील तीन जण आले. त्यांनी प्रदीप यांना अडवून तू शेतकरी है हमको कम भाव में भाजीपाला खरेदी करके दे, असे म्हटले. त्यांना प्रदीप यांनी नकार दिल्याने आरोपींनी त्यांच्या खिशातून ५० हजारांचे बंडल काढून घेतले. त्यानंतर दोघांनी त्यांना मोपेडवर बसवून घेऊन गेले.

Sambhaji Nagar Crime News
Municipal Corporation CBSE school : मनपाच्या सीबीएसई शाळेत प्रवेशासाठी रांगा

प्रदीप हे मोपेडवर उडी मारून आरडाअ ओरड करत असताना तिघांनी त्यांना खाली उतरून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. चाकूने बरगडीवर वार करून गंभीर जखमी केले. प्रदीप यांचा आवाज ऐकून सुरक्षारक्षक पळत आले. त्यांना पाहून ५० हजारांची रोकड घेऊन तिघे तेथून पसार झाले. पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर जखमी प्रदीप यांना घाटीत भरती करण्यात आले. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news