

छत्रपती संभाजीनगर : मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. जास्तवेळ मोबाईल पाहण्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतो, दृष्टी कमी होऊ शकते आणि डोकेदुखीचा त्रास होऊन मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढतो, असे सुभाष पाटील यांनी स्वप्नपूर्ती सेवीभावी संस्थेच्या वतीने आयोजित संस्कार शिबिरात मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम पटवून सांगितले.
शाहूनगर, सिडको येथे स्वतंत्रदिनाचे औचित्य साधून लहान मुलांसाठी संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष दीपक मस्के, प्रमुख पाहुणे म्हणून कॉंग्रेस पक्षाचे सुभाष पांडभरे पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप, शांतीलाल पवार यांची उपस्थिती होती. संस्थेच्या वतीने बाल संस्कार केंद्र सुरू करण्यात आले. यावेळी परिसरातील लहान मुला-मुलींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. स्वप्नपूर्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते भीमराव आढाव, रावसाहेब गवई, संस्थेचे पदाधिकारी सौ. प्रभावती म्हस्के, अभिमान खरात, कविता सोनवणे, शारदा काकड, लक्ष्मण टोम्पे, इत्यादी मोठ्या संख्येने लहान मुले मुली उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर काकड यांनी तर आभार विजय खरात यांनी मानले.