Marijuana trafficking : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला १० किलो गांजासह पकडले

घरची परिस्थिती बेताची, खर्च भागविण्यासाठी तस्करीच्या मार्गाला
Marijuana trafficking
Marijuana trafficking : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला १० किलो गांजासह पकडलेFile Photo
Published on
Updated on

Engineering student caught with 10 kg of marijuana

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अभियांत्रिकीचा खर्च भागविणे कठीण झाल्याने एक विद्यार्थी थेट गांजा तस्करीच्या आरोपी किशोर मार्गावर गेल्याची सांगळे धक्कादायक घटना समोर आली आहे. झेंडा चौक येथे किशोर गणेश सांगळे (२१, रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) याला मुकुंदवाडी पोलिसांनी सापळा रचून पकडल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्याच्या ताब्यातून १० किलो गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची न्यायालयाने दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली.

Marijuana trafficking
PM Awas Yojana : पीएम आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज

अधिक माहितीनुसार, आरोपी किशोर हा पुणेच्या सिंहगड भागातील एका अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याच्या गावाकडे घरी त्याची एकटी आई असते. घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असल्याने त्याने त्यातून अभियांत्रिकीला प्रवेश मिळविला. मात्र आता खर्च पेलवत नसल्याने तो वाईट मार्गाला गेला. काही मित्रांनी त्याला गांजा तस्करीच्या मार्गावर नेले.

Marijuana trafficking
Shendra MIDC : पथदिव्यांबाबत एमआयडीसीच अंधारात कधी लागणार दिवे ?

त्याच्याकडे इतर जिल्ह्यातून आलेला १० किलो गांजाची बॅग केवळ एका पेडलरला देण्याचे काम होते. त्यासाठी त्याला पाच हजार रुपये मिळणार होते. त्याने मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरातून ही गांजाची बॅग घेतली. तेथून ती बॅग झेंडा चौकात घेऊन गेला. मात्र पेडलर येण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला सापळा रचून बेड्या ठोकल्या. बॅग कोणी दिली व त्याला ५ हजार देण- ारा कोण ? हे समोर आलेले नाही. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय बहुरे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news