Sambhajinagar News : अतिक्रमण, तिसऱ्या अपत्यामुळे बावीस नगरसेवक अडचणीत

महानगरपालिकेकडे तीन महिन्यांपासून तक्रारी धूळखात पडून
Chhatrapati Sambhajinagar
Sambhajinagar News : अतिक्रमण, तिसऱ्या अपत्यामुळे बावीस नगरसेवक अडचणीतFile Photo
Published on
Updated on

Encroachment and Third Child: 22 Corporators in Trouble

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर होताच प्रशासनाकडे निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांविरोधात तिसरे अपत्य आणि अतिक्रमण बाबतच्या तक्रारी दाखल झाल्या. या तक्रारींचा अभ्यास करून अधिकाऱ्यांनी अहवालदेखील तयार केला आहे. आता महापालिका आयुक्त अमोल येडगे लवकरच याची माहिती घेऊन नगरसेवकांना सुनावणीसाठी नोटीस बजावणार आहेत. त्यामुळे त्या २२ नगरसेवकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar | गुन्हे दाखल... तरीही एमआयएम नगरसेवकांवर कारवाई नाही

महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले. तर १६ जा नेवारी रोजी मतमोजणी झाली. त्यानंतर निवडून आलेल्या नगरसेवकांची पहिली सर्वसाधारण सभा होण्यापूर्वीच विरोधकांनी त्यांच्याविरोधात महापालिका निवडणूक विभागाकडे तक्रार देणे सुरू केले.

यात काही नगरसेवकांविरोधात तिसरे अपत्य लपविण्यात आल्याची तर काहींविरोधात अतिक्रमण असल्याबाबतच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. यात सर्वाधिक एमआयएमचे नगरसेवक आहेत. त्यानंतर भाजप, शिवसेनेच्या नगरसेवकांचा देखील यात समावेश आहे. सुमारे २२ ते २५ हून अधिक नगरसेवक असल्याची माहिती महापालिका निवडणूक विभागाकडून प्राप्त झाली आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Bachchu Kadu : गरिबांच्या माठांवर बुलडोजर, श्रीमंतांच्या अतिक्रमण कारवाईला बगल का ?

या सर्व नगरसेवकांनी महापालिका निवडणूक आयोगासह शासनाची फसवणूक करीत निवडणूक लढल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे, अशी मागणी तक्रार देणाऱ्यांनी केली आहे.

आयुक्त घेणार माहिती

तिसरे अपत्य आणि अतिक्रमण याबाबत नगरसेवकांविरोधात महापालिकेला ज्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याची अद्याप माहिती नसून ही माहिती घेऊन सध्या प्रशासनाने त्यात काय प्रक्रिया पूर्ण केली, याचा आढावा घेत लवकरच संबंधित नगरसेवकांना सुनावणीच्या नोटीस बजावण्यात येईल, असे महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.

प्राप्त तक्रारींचे सर्वेक्षण पूर्ण

महापालिकेला प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार प्रशासनाने अनधिकृत बांधकामाबाबतच्या तक्रारींची शहानिशा केली. मात्र, तिसरे अपत्यबाबतची उलट तपासणी अजूनही प्रशासनाकडून झालेली नाही. याबाबत तक्रारीमध्येच माहिती उपलब्ध असून त्याबाबतची सत्यता अद्यापही तपासण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news