Chhatrapati Sambhajinagar | गुन्हे दाखल... तरीही एमआयएम नगरसेवकांवर कारवाई नाही

चर्चा भाजप-एमआयएममधील छुप्या मैत्रीची, मनपा अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagarfile photo
Published on
Updated on

शहागंज भागात एका महिलेसह पतीला पथविक्रेत्याने केलेल्या मारहाणीनंतर महापालिकेने या भागातील पथविक्रेत्यांच्या हातगाड्या जप्त करून दुकानांचे अतिक्रमण काढले होते. या कारवाईनंतर काही पथविक्रेत्यांनी पुन्हा सायंकाळी याच भागात हातगाड्यांचे अतिक्रमणाला सुरुवात केली होती. हा प्रकार माहिती पडल्यानंतर महापालिकेचे पथक पुन्हा कारवाईसाठी गेले एमआयएमच्या काही नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी विरोध करीत पथकाला परतावून लावले होते. या विरोधाचे रिल्स तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित केले होते. अतिक्रमण हटाव कारवाईला विरोध केल्यामुळे १२ नगर-सेवकांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar-महामानवाच्या जयंतीत औरंगजेबाचा फोटो; छत्रपती संभाजीनगरात राजकारण तापले

या प्रकारणात कारवाई न झाल्याने एमआयएम नगरसेवकांचे मनोबल वाढले आहेत. त्यातूनच स्वीकृत नगर सेवक होण्यापूर्वीच एमआयएमच्या एका पदाधिकार्याने कार्यकर्त्याला सोबत घेत आपण नगरसेवक आहोत, असे भासवून सिडको एन-८ येथील पालिकेचे हॉस्पिटल आणि मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे जाऊन तेथील अधिकारी - कर्मचाऱ्यांवर दमदाटी केली. या प्रकरणातही सरकारी कामात आडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar | अल्पवयीन लुटारू...चेनस्नॅचिंग..शहरात रात्रीचा थरार! नागरिक दहशतीत

कर्मचारी धास्तावले

महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना एमआयएमचे नगर-सेवक दमदाटी करीत आहेत. त्यामुळे हे कर्मचारी सध्या धास्तावले आहेत, त्यामुळेच आरेरावी आणि दमदाटी केल्यानंतरही आरोग्य विभागातील महिला डॉक्टरांनी गुन्हा दाखल करताना वरिष्ठ अधिकार्यांकडे भीती व्यक्त केली होती, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

या दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी कुठलीच कारवाई तर केली नाहीच. शिवाय महापालिकेने जाहीर करूनही एकाही नगरसेवकाविरोधात महापालिका अधिनियम १० डीअंतर्गत कारवाई केली नाही. उलट एमआयएमच्या नगरसेवकांची समजूत काढून त्यांना संधी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे महापालिकेत भाजप-एमआयएमच्या छुप्या मैत्रीची चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news