Sambhajinagar News : अन्न नासाडी प्रतिबंधक कायदा लागू करा, अन्यथा १५ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण

५१ हजार नागरिकांच्या सह्यांचे मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन
Sambhajinagar News : अन्न नासाडी प्रतिबंधक कायदा लागू करा, अन्यथा १५ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण
Published on
Updated on

Enact the Food Waste Prevention Act; otherwise, an indefinite hunger strike will begin on October 15th.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात अन्न नासाडी १५ प्रतिबंधक कायदा तात्काळ लागू करावा, या मागणीसाठी अन्न वाचवा समितीच्या वतीने ५१ हजार नागरिकांच्या सह्या गोळा करण्यात आल्या आहेत. येत्या ऑक्टोबरपर्यंत हा कायदा लागू न केल्यास १६ ऑक्टोबरला जागतिक अन्न दिनाचे औचित्य साधून बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा समितीने दिला आहे. लवकरच समितीचे शिष्टमंडळ मुंबईत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या सह्यांचे निवेदन देणार आहे.

Sambhajinagar News : अन्न नासाडी प्रतिबंधक कायदा लागू करा, अन्यथा १५ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण
स्वीकृत नगरसेवकासाठी नेत्यांची मुले, बहीण-भाऊ रिंगणात

देशात दररोज २४४ कोटी रुपयांचे अन्न उकिरड्यावर फेकले जाते, तर कुपोषणामुळे रोज चार हजार बालके दगावतात आणि २२ कोटी लोक अर्धपोटी झोपतात. या भीषण वास्तवाकडे लक्ष वेधत समिती २०१६ पासून या १२ वर्षांच्या जनजागृतीनंतर आता कडक कायद्याचीच गरज असल्याचे समितीचे संस्थापक अध्यक्ष अनंत मोताळे यांनी स्पष्ट केले.

Sambhajinagar News : अन्न नासाडी प्रतिबंधक कायदा लागू करा, अन्यथा १५ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण
Sambhajinagar water supply : शहराची २० वर्षांची प्रतीक्षा संपली

समितीच्या या मागणीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मंत्री अतुल सावे, चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री संजय शिरसाठ, खा. संदिपान भुमरे, आमदार अंबादास दानवे, संजय केणेकर यांनीही सह्या करून या कायद्याला आपला पाठिंबा दर्शवला या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला अन्न वाचवा समितीचे संस्थापक अध्यक्ष अनंत मोताळे, सचिव नंदकुमार कुलकर्णी, चंद्रकांत वाजपेयी, अॅड. श्रीचंद जिग्यासी, माजी सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे, निलेश चनसोड, पूजा सोनवणे, लता कुलकर्णी, राजेंद्र वाहुळे, रुपाली वाहुळे, प्रभाकर दिवटे आणि शिवाजी पाथ्रीकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news