Gangapur News : टायर फुटलेल्या ट्रकला आयशरची धडक; चालक ठार

टायर फुटल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून भरधाव वेगाने आलेल्या आयशरने जोरदार धडक दिली.
Gangapur Accident News
Gangapur News : टायर फुटलेल्या ट्रकला आयशरची धडक; चालक ठारFile Photo
Published on
Updated on

Eicher hits truck with flat tire; driver killed, one death

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : टायर फुटल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून भरधाव वेगाने आलेल्या आयशरने जोरदार धडक दिल्याने आयशर चालकाचा मृत्यू झाला. गंगापूर-अहिल्यानगर रस्त्यावर गंगापूर फाट्याजवळ हॉटेल ५१-५१ समोर रविवारी (दि.२) पहाटे हा अपघात झाला.

Gangapur Accident News
Crime News : प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराने मित्राच्या मदतीने काढला काटा

या अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव गणी अब्बास शेख (वय २५, रा. बोलेगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे आहे. ट्रकचे टायर फुटल्याने चालकाने वाहन हॉटेल ५१-५१ समोर रस्त्याच्या कडेला उभे केले होते. दरम्यान, मागून आलेल्या आयशर चालकाला समोरील ट्रकचा अंदाज न आल्याने आयशरची ट्रकवर जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की आयशरचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला आणि चालक वाहनातच अडकून पडला.

अपघाताची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अनिल झोरे, रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे तसेच क्रेन चालक अरुण सावंत घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर चालकाला वाहनातून बाहेर काढण्यात आले. जखमीला तातडीने गंगापूर येथून घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

Gangapur Accident News
Maratha Kranti Morcha : ९ ऑगस्टपासून क्रांती चौकात बेमुदत उपोषणावर मराठा क्रांती मोर्चा ठाम

त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची नोंद गंगापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news