सकाळी बनवलेले पदार्थ संध्याकाळपर्यंत खा, हॉटेल व्यावसायिकांचा गरम पदार्थ देण्यास नकार

तालुक्यात गॅसचा तुटवडा
sambhajinagar lpg cylinder shortage
सकाळी बनवलेले पदार्थ संध्याकाळपर्यंत खा, हॉटेल व्यावसायिकांचा गरम पदार्थ देण्यास नकारfile photo
Published on
Updated on

Eat food prepared in the morning by the evening; hotel owners refuse to serve hot dishes

सुनील मरकड

खुलताबाद : तालुक्यात सध्या व्यावसायिक गॅसचा तीव्र तुटवडा जाणवत असून याचा परिणाम थेट हॉटेल व्यवसायवर झाला आहे. गॅस सिलिंडर मिळण्यास विलंब होत असल्यामुळे अनेक हॉटेल चालकांनी गरमागरम पदार्थ देण्यास नकार देण्यास सुरुवात केली आहे.

sambhajinagar lpg cylinder shortage
एका उद्योजकाच्या दुकानासह सात व्यावसायिक मालमत्ता सील

काही हॉटेलमध्ये ग्राहकांना जे आहे ते घ्या आणि खा असे सांगितले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. चहा हॉटेल वाले गोल्डन चहा, कमी साखर, काळा चहा, कॉफी देण्यासाठी टाळत आहे. सकाळी एकदा तयार केलेला चहा संपत नाही तोपर्यंत गॅस परत पेटणार नाही. असे सांगून टाळत आहे. दुसरीकडे हॉटेल व्यावसायिकांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. अनेक हॉटेल चालकांकडे एक किंवा दोनच गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवताच काहींनी चुलीवर चहा बनवण्यास सुरुवात केली आहे.

गॅस सिलिंडर उपलब्ध असल्यामुळे ते मर्यादित प्रमाणातच स्वयंपाक करत आहेत. काही हॉटेलमध्ये सकाळी तयार केलेले पदार्थ दिवसभर ग्राहकांना दिले जात आहेत, तर काही हॉटेलमध्ये गरमागरम पदार्थ देण्यास नकार देत जे उपलब्ध आहे तेच घ्या असे सांगितले जात आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असल्याचे सांगितले जात आहे.

sambhajinagar lpg cylinder shortage
Sambhajinagar News : इस्त्रो सहलीसाठी नऊ तालुक्यांमधून तब्बल ९२ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

याचा परिणाम एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावरही झाल्याने शहरासह ग्रामीण भागात सिलिंडर उपलब्ध होण्यास मोठा विलंब होत आहे. अनेक गॅस एजन्सींमध्ये सिलिंडरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असली तरी पुरवठा मात्र मर्यादित असल्यामुळे ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

हॉटेल बंद करण्याची वेळ

शहरातील हॉटेल सवेरा चालक युनूस कुरेशी सांगितले की, गॅस वेळेवर मिळत नसल्यामुळे व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे. ग्राहकांना गरम चहा, नाश्ता किंवा जेवण देणे शक्य होत नाही. जर अशीच परिस्थिती राहिली तर काही दिवस हॉटेल बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news