Sambhajinagar News : रिक्षाचालक दारूच्या नशेत चढला मोबाईल टॉवरवर, तीन तास सुरू होता गोंधळ

हात, पाय सोडून खाली डोकावत हाेता. त्याचा तोल जात असल्याने खालून जमलेले नागरिक ओरडायचे. त्यानंतर तो पुन्हा मागे सरकायचा.
Sambhajinagar News
Sambhajinagar News : रिक्षाचालक दारूच्या नशेत चढला मोबाईल टॉवरवर, तीन तास सुरू होता गोंधळFile Photo
Published on
Updated on

Drunk rickshaw driver climbs onto mobile tower

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा

रिक्षाचालक दारूच्या नशेत थेट मोबाईल टॉवरवर चढला. हा प्रकार दुपारी तीनच्या सुमारास डीकेएमएम महाविद्यालयाजवळ, पहाडसिंगपुरा भागात घडला. बेगमपुरा पोलिसांनी धाव घेतली. त्याला खाली येण्यासाठी सांगूनही तो ऐकत नव्हता. अखेर अग्निशमनचे जवान दाखल झाले. सायंकाळी सहाच्या सुमारास त्याला सुखरूप खाली उतरविण्यात आले. रिक्षाचालक विजय रामराव भवरे (५३, रा. न्यू पहाडसिंगपुरा) असे त्याचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांनी दिली.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : सिडकोत चोरट्यांनी शिक्षकाचे घर फोडले, साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे दागिणे लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद

भवरे हा डीकेएमएम कॉलेज समोर असलेल्या मोबाईल टॉवरवर चढला. तो दारूच्या नशेत धुंद होता. दुपारी तीनच्या सुमारास बेगमपुरा पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांनी फौजफाटा घेऊन धाव घेतली. दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक कांचन मिरघे, अंमलदार कल्पना खरात, निर्मला निंभोरे, सरिता कुंडारे, कविता गवळी, कल्पना नागरे, जाधव, फुले या देखील पोहोचल्या. टॉवरवर व्यक्ती चढला असल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

त्यानंतर अग्निशमनला कळविण्यात आले. उप अग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, अशोक खांडेकर, ड्युटी इन्चार्ज दीपराज गंगावणे, संग्राम मोरे, अजिंक्य भगत, दीपक गाडेकर, प्रणाल सूर्यवंशी, मनसुब सपकाळ, उमेश भोसले,जगदीश सलामवाद यांनी टॉवरवर जाऊन भवरेला सुखरूप खाली उतरविले. त्यानंतर सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात दारू पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी भवरे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : बस बांधणीचा डोलारा जुन्याच चेसिसवर

तीन तास सुरू होता गोंधळ

विजय भवरे हा टॉवरवर चढून एका ठिकाणी झोपला. दारूच्या नशेत धुंद असल्याने हात, पाय सोडून खाली डोकावत होता. त्याचा तोल जात असल्याने खालून जमलेले नागरिक ओरडायचे. त्यानंतर तो पुन्हा मागे सरकायचा. हा गोंधळ तीन तास सुरू होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news