Drug Trafficking : ड्रग्ज तस्करांना बेड्या; इंदूरहून आणायची मेफेड्रोन

सिटी चौक पोलिसांची कारवाई; तलवारीसह गांजा आणि सिरिंज जप्त
Sambhajinagar Drug Trafficking
Drug Trafficking : ड्रग्ज तस्करांना बेड्या; इंदूरहून आणायची मेफेड्रोनFile Photos
Published on
Updated on

Drug Traffickers Arrested; Were Transporting Mephedrone from Indore

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका सराईत तस्करासह सुरज तिवारी त्याच्या साथीदाराला सिटी चौक पोलिसांनी सापळा रचून अटक केली. आरोपी गेल्या वर्षभरापासून इंदूरहून एमडी (मेफेड्रोन) आणून शहरात विक्री करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या कारवाईत पोलिसांनी गांजा, एमडी ड्रग्ज, तलवार आणि १६ सिरिंज असा मुद्देमाल जप्त केला आहे.

Sambhajinagar Drug Trafficking
MD drugs seizure : मसनतपूर भागात एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

सुरज जगन्नाथ तिवारी (३१, रा. कैलासनगर, आकाशवाणी) आणि त्याचा साथीदार शेख अखिल शेख खलील (३४, रा. कौसर पार्क, नारेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली.

खडकेश्वर येथील शेतकी भवनाच्या पडक्या इमारतीत एक तरुण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सिटी चौक पोलिसांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक दगडखैर, संजय राठोड, सहायक फौजदार मुनीर पठाण, अंमलदार आनंद वाहूळ, मनोहर त्रिभुवन, दयानंद स्वामी, निशा जाधव आणि पथकाने या ठिकाणी सापळा रचला.

Sambhajinagar Drug Trafficking
अंबाजोगाई येथे १३ लाखांचा गांजा जप्त

शेतकी भवनच्या पडक्या इमारतीत सुरज तिवारीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता ८७२ ग्रॅम गांजा, ७ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि एक धारदार तलवार आढळून आली.

धोकादायक नशा; जागेवरच सिरिज उपलब्ध

तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरज हा ड्रग्ज घेणाऱ्यांना जागेवरच इंजेक्शनच्या सिरिंज उपलब्ध करून देत असे. त्याच्याकडून १६ सिरिंज पोलिसांनी जप्त केल्या आहेत. शरीरात टोचून ड्रग्जची नशा जीवघेणी आणि गंभीर आजार निर्माण करणारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news