Drought : दुष्काळामुळे जरंडी परिसरातील फळबागा धोक्यात

मंडळातील मोसंबी उत्पादक शेतकरी पाण्याअभावी संकटात; उपाययोजना करण्याची मागणी
Drought
Drought : दुष्काळामुळे जरंडी परिसरातील फळबागा धोक्यातfile photo
Published on: 
Updated on: 

Drought: Orchards in the Jarandi area at risk

जरंडी, पुढारी वृत्तसेवा : सोयगाव तालुक्यातील जरंडी मंडळ परिसरात दुष्काळाचे सावट अधिक गडद होत असून त्याचा मोठा फटका पेरू आणि मोसंबी फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. पावसाची कमतरता, पाणीटंचाई आणि जमिनीतील घटणारी ओल यामुळे फळबागा जगविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. वर्षानुवर्षे कष्ट करून आणि लाखो रुपयांची गुंतवणूक करून उभ्या केलेल्या फळबागा दुष्काळाच्या संकटात सापडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

Drought
Sillod News : दुष्काळात गरजूंना मदतीचा आधार; १ हजार विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप

जरंडी मंडळातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून पेरू आणि मोसंबीच्या फळबागांची लागवड केली व अनेक वर्षे बागांची जोपासना केली. मात्र यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे या अपेक्षांवर पाणी फिरण्याची वेळ आली आहे.

पाण्याचा प्रश्न गंभीर

पेरू आणि मोसंबीच्याफळबागांना नियमित पाणी देणे आवश्यक असते. मात्र पावसाअभावी विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांवरील पाण्याची उपलब्धता कमी आहे. काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी अतिरिक्त आर्थिक खर्च करावा लागत आहे.

दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या अनेक वर्षाच्या मेहनतीचे आणि आर्थिक नियोजनाचेही नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. येत्या काळातही जनावरांच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची चिंता ग्रामस्थांना सतावत आहे. प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

Drought
Short Circuit Fire : शॉर्टसर्किटमुळे हळदा येथे घराला आग; घरासह किराणा दुकान जळून खाक

लाखोंची गुंतवणूक धोक्यात

फळबाग उभी करण्यासाठी रोपे, खते, औषधे, फवारणी, मजुरी आणि ठिबक सिंचन यावर मोठा खर्च करावा लागतो. अनेक वर्षे मेहनत घेतल्यानंतर झाडांपासून उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. अशा परिस्थितीत दुष्काळामुळे बागांचे नुकस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.