गोदावरी नदीत जीवन संपविले; आईनंतर १८ तासानंतर सापडला बाळाचा मृतदेह

पाटेगाव येथील घटना
Godavari river tragedy
गोदावरी नदीत आईने आपल्या बाळासह जीवन संपविले.
Published on
Updated on

पैठण : पैठण शहरातील पूजा प्रभाकर व्होरकटे (वय २९ रा.पैठण) या महिला डॉक्टरने मंगळवारी (दि.१) आपल्या सहा महिन्याच्या बाळासह पाटेगाव येथील गोदावरी नदीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली होती. या महिला डॉक्टरचा मृतदेह काही तासातच आढळून आला. परंतु क्रिश या सहा महिन्याच्या बाळाचा मृतदेह शोध घेऊनही काल सापडला नाही.

Godavari river tragedy
छ.संभाजीनगर : ६ महिन्याच्या बाळासह डॉक्टर महिलेची गोदावरी नदीत उडी

पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना बुधवारी (दि.२) सकाळी पुन्हा पाचरण करून शोधकार्य सुरू केले. अग्निशमन दलाचे अधिकारी रायबा पाटील, अशोक खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वसीम पठाण, जवान दिनेश मुंगसे, केतन घाडगे, संग्राम मोरे, प्रसाद शिंदे, सुजित कल्याणकर, अजिंक्य भगत, रवी दुधे, मतीन शेख, नंदकुमार घुगे, पैठण अग्निशामन दलाचे खलील धांडे, अमोल शेजुळ, जबी धांडे यांनी तब्बल १८ तासांनतर नदीतून बाळाचा मृतदेह शोधून काढला.

Godavari river tragedy
नाशिक : गणेश विसर्जनाला गेलेल्या दोघांचा वालदेवी नदीत बुडून मृत्यू

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news