सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांची प्रलंबित फेलोशिप वितरित करा

आ. सतीश चव्हाण यांची विधान परिषदेत मागणी
Sarathi's research students
सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांची प्रलंबित फेलोशिप वितरित कराfile photo
Published on
Updated on

Distribute pending fellowships to Sarathi's research students

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा सारथीच्या संशोधक विद्याथ्यांची प्रलंबित फेलोशिप त्वरित वितरित करण्यात यावी, अशी मागणी बुधवारी (दि.२५) मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत विशेष उल्लेखाव्दारे केली.

Sarathi's research students
चार महिन्यांत धावल्या ८६३ लालपरी

छत्रपती संभाजीनगर विभागातील संशोधक विद्यार्थ्यांना जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीतील फेलोशिप अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे संशोधन थांबले असून, प्रयोगशाळा खर्च, डेटा संकलन, प्रवास, अभ्यास साहित्य, उपकरणे यासाठी खर्च करण्यास विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.

Sarathi's research students
Chhatrapati Sambhajinagar ZP : रखडलेला विकासाचा बॅकलॉग भरून काढणार

दर सहा महिन्यात विद्यार्थ्यांनी प्रगती अहवाल दिल्यानंतर त्यांना फेलोशिप मिळते. परंतु मागील एक वर्षापासून फेलोशिप न मिळाल्याने अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणीत आले असल्याचे आ. सतीश चव्हाण यांनी विशेष उल्लेखाद्वारे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच विद्यार्थ्यांची मागील वर्षभरापासून प्रलंबित असलेली फेलोशिप, घरभाडे भत्ता त्वरित वितरित करावा अशी मागणी चव्हाण यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news