Chhatrapati Sambhajinagar ZP : रखडलेला विकासाचा बॅकलॉग भरून काढणार

नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांनी व्यक्त केला निर्धार
Chhatrapati Sambhajinagar ZP
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदpudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामविकासाचा पाया भक्कम होतो; मात्र मागील साडेतीन ते चार वर्षांच्या प्रशासक काळात विकासकामांना ब्रेक लागला. अधिकारी गावपातळीपर्यंत पोहोचले नसल्याने अनेक योजना रखडल्या आणि विकासाची गती मंदावली, असे सांगत, हा बॅकलॉग आता भरून काढणार, असा ठाम निर्धार जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अविनाश गलांडे व उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल यांनी व्यक्त केला.

पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष गलांडे म्हणाले की, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि सामाजिक कल्याण या मूलभूत क्षेत्रांतील कामांना तातडीने गती दिली जाणार आहे. गावपातळीवरील अडचणी सोडवून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर राहणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar ZP
Industrial gas crisis : मागणी पन्नास उद्योगांची, मिळाला अवघ्या 5 जणांना पाईपव्दारे गॅस

दरम्यान, जिल्हा परिषद मुख्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे प्रशासक काळात निधीअभावी कामही रखडले. आता शासनदरबारी पाठपुरावा करून आवश्यक निधी उपलब्ध करून हे काम लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. काम पूर्णत्वास आल्यावर सर्व विभाग एका छताखाली आल्यास कामकाजाला गती मिळेल, असेही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गलांडे त्यांनी सांगितले.

इमारतीसाठी शासनाकडूनच निधी घेणार

जिल्हा परिषद मुख्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी आवश्यक निधी शासनाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर मिळवण्यात येईल. या अगोदर इमारतीसाठी सेसचा काही निधीचा वापर करण्यात आला होता; मात्र आता सेसचा निधी वापरण्यात येणार नाही. सेसचा पैसा महत्त्वाच्या योजनांसाठी वापरणार असल्याचा विश्वासही अध्यक्ष गलांडे यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news