MSRTC financial loss : डिझेल दरवाढीने एसटीला रोज ७० लाखांचा फटका

लोकवाहिनीला सावरण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा
MSRTC financial loss
डिझेल दरवाढीने एसटीला रोज ७० लाखांचा फटकाpudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : डिझेलची दरवाढ प्रतिलिटर ६ रुपये ३५ पैसे इतकी झाली आहे. या दरवाढीमुळे एसटीला दररोज सुमारे ७० लाख रुपयांचा अतिरिक्त फटका बसणार असून, झपाट्याने वाढत चाललेल्या इंधनाच्या किमती पाहता गोरगरिबांच्या लोकवाहिनीला सावरण्यासाठी जनते -नेच स्वतः पुढाकार घेतला पाहिजे, असे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी मंगळवारी (दि. २६) पत्रकार परिषदेत केले.

बरगे एसटी कामगारांच्या बैठकीसाठी शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यात त्यांनी एसटीला दररोज सरासरी १० लाख ८७ हजार लिटर इतके डिझेल लागत आहे. यापूर्वी इंधनावर वर्षाला सरासरी ३ हजार ४०० कोटी रुपये इतका खर्च होत होता. या खर्चात आता वाढ होत असून, १२००० कोटी रुपये इतका संचित तोटा असलेल्या एसटीच्या चिंतेत भर पडली आहे.

MSRTC financial loss
Chhatrapati Sambhajinagar News : जलसंपदात कामाआधीच कंत्राटदार फायनल

एसटीची आर्थिक स्थिती सध्या चिंताजनक असून, या एप्रिल महिन्यात साधारण ७६ कोटी ४७ लाख रुपये इतका मोठा तोटा झाला आहे. १० टक्के हंगामी भाडेवाढ संपल्यावर त्यात मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे, अशीही माहिती बरगे यांनी दिली.

वैधानिक देणी थकीत ६ हजार कोटींवर

पी.एफ., ग्रॅज्युइटी, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, वाढीव घरभाडे भत्ता, वाढीव वार्षिक वेतनवाढ फरकाची रक्कम, पुरवठादारांची देणी, इंधन खर्च थकीत देणी इत्यादी साधारण सहा हजार कोटी रुपयांची वैधानिक देणी रक्कम थकीत आहे. गरिबांच्या दळणवळणाचे मुख्य साधन असलेल्या एसटीला वाचविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सामूहिकरीत्या आंदोलन करून प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही बरगे यांनी म्हटले आहे.

MSRTC financial loss
Manvat Municipal Council | मानवत नगरपरिषदेत ऐतिहासिक ठराव मंजूर: जाचक मालमत्ता करास अखेर स्थगिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news