Vaijapur News : कॅनमध्ये डिझेल नाकारले, खंडाळ्यात रास्ता रोको

वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील एचपी पेट्रोलियम पंपावर कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी रास्ता रोको आंदोलन केले.
Vaijapur News
Vaijapur News : कॅनमध्ये डिझेल नाकारले, खंडाळ्यात रास्ता रोकोfile photo
Published on
Updated on

Diesel in cans rejected, road blocked in Khandala

शिऊर, पुढारी वृत्तसेवा : वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील एचपी पेट्रोलियम पंपावर कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी रास्ता रोको आंदोलन केले. जनक्रांतीसेनेचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील साळुंके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर पंप प्रशासनाने प्रत्येकी दोन हजार रुपयांचे डिझेल देण्यास सुरुवात केली.

Vaijapur News
Hingoli Diesel Shortage : कुणी डिझेल देता का डिझेल!

खरीप हंगामाच्या मशागतीची कामे सुरू असताना शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व शेतीच्या अवज-ारांसाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची आवश्यकता आहे. मात्र पंपावर डिझेलचा साठा उपलब्ध असूनही कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. ट्रॅक्टर पंपावर आणा आणि किमान दोन हजारांचे डिझेल भरा, अशी अट घालण्यात येत असल्याने अनेक शेतकरी दिवसभर पंपावर ताटकळत होते.

Vaijapur News
Nanded Diesel Shortage | हिमायतनगरमध्ये डिझेल टंचाई; शेतकऱ्यांची मशागतीची कामे ठप्प, ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा

या प्रकाराची माहिती मिळताच अजय पाटील साळुंके यांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांसह रास्ता रोको आंदोलन सुरू केले. घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी पंप चालकाच्या मनमानी कारभाराचा निषेध केला. आंदोलनानंतर प्रशासन आणि पंप व्यवस्थापनाच्या मध्यस्थीने सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास डिझेल वाटपास सुरुवात करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news