House burglary : भाजप जिल्हा सचिवाचे भरदिवसा घर फोडले

15 लाख लंपास : मयूरपार्क भागातील घटना
House burglary
भाजप जिल्हा सचिवाचे भरदिवसा घर फोडलेfile photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मयुरपार्क भागात भरदिवसा घरफोडीची एक खळबळजनक घटना घडली आहे. भाजपचे जिल्हा सचिव अशोक जगधने यांचे घर फोडून चोरट्यांनी कपाटातील 15 लाख रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना मंगळवारी (दि.10) रोजी सकाळी पावणे अकरा ते सव्वा तीन वाजेच्या दरम्यान घडली.

अशोक देविदासराव जगधने (62, हरसिद्धी हाऊसिंग सोसायटी, एसबीओ शाळेसमोर, मयुरपार्क) हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत. तसेच त्यांची एमआयडीसी वाळूज भागात पार्वती इंडस्ट्रीज नावाने कंपनी आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी सकाळी 10:45 वाजेच्या सुमारास जगधने हे घराला कुलूप लावून त्यांच्या कंपनीत गेले होते. त्यांचा मुलगा शाळेत आणि पत्नी पंचायत समिती येथे ड्युटीवर गेल्यामुळे घर बंद होते.

House burglary
Manoj Jarange | वर्षभरात संपूर्ण मराठा समाज ओबीसीत जाणार : मनोज जरांगे

दुपारी 3:15 वाजेच्या सुमारास त्यांच्या घरी काम करणारी महिला वंदना आली असता, तिला घराचा दरवाजा उघडा दिसला. तिने शेजारी आणि जगधने यांच्या मुलीला बोलावून घेतले. घरात प्रवेश केला असता सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. चोरी झाल्याची माहिती मिळताच जगधने यांनी तत्काळ घरी धाव घेतली. त्यानंतर हर्सूल ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉकर तोडून रोकड पळवली

चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटाचे लॉकर तोडून 15 लाख रुपये चोरून नेले. यामध्ये जगधने यांचे स्वतःचे 7 लाख रुपये तर उर्वरित 8 लाख मित्रांकडून उसने घेतलेले होते. उच्चभ्रू सोसायटीमध्ये असलेला बंगला चोरट्यांनी भरदिवसा टार्गेट केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

House burglary
Illegal opium cultivation : वाशी पाठोपाठ कळंबमध्येही अफूचा मळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news