Illegal opium cultivation : वाशी पाठोपाठ कळंबमध्येही अफूचा मळा

सलग दुसऱ्या दिवशी कारवाई; 15 लाखांची झाडे जप्त
Illegal opium cultivation
धाराशिव पोलिसांनी जप्त केलेले अफू पिकाचे बोंड.pudhari photo
Published on
Updated on

कळंब : धाराशिव जिल्ह्यात अफूच्या अवैध शेती विरोधात पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. वाशी तालुक्यातील दसमेगाव येथील कारवाई ताजी असतानाच आता कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथेही अफूची शेती आढळून आली आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सुमारे 15 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त करण्यात आली असून, लागोपाठ दुसऱ्या दिवशी झालेल्या या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी ते मांडवा रस्त्यावरील गट क्रमांक 316 मधील शेतात अफूची लागवड करण्यात आली होती. ही माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलिस अधीक्षक शफकत अमना यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार व पोलिस निरीक्षक अजित चिंतले यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. संबंधित शेतमालक विलास नवनाथ कवडे यांच्या शेताची पाहणी केली असता, तिथे अफूची झाडे आढळून आली. या कारवाईत सुमारे 100 किलो वजनाचा ओला अफू (झाडे व बोंडे) जप्त करण्यात आली आहे.

Illegal opium cultivation
Valentine's Day 2026 special | 'Single' असणं गुन्हा आहे का?…जाणून घ्या बदलत्या जगाची नवी परिभाषा

बाजारात प्रतिकिलो अंदाजे 15 हजार रुपये या दराने या मुद्देमालाची किंमत 15 लाख रुपये असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ मगर यांनी दिली. या कारवाईत कळंब पोलिस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी आणि होमगार्ड यांनी सहभाग घेतला.

जिल्ह्यात ऑपरेशन अफू : धाराशिव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अफूच्या शेतीवर कारवाई झाली आहे. आधी वाशी आणि आता कळंब तालुक्यात अफू सापडल्याने ग््राामीण भागात छुप्यारीतीने अंमली पदार्थांची शेती केली जात असल्याचे उघड झाले आहे. पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मसफाई मोहिमेफमुळे बेकायदा कृत्य करणाऱ्या शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Illegal opium cultivation
Valentine's day | No Proposal, No Drama! गुपचूप वाढलं प्रेम, थेट हिमाचलमध्ये लग्न, Aditya Dhar-Yami Gautam ची खास प्रेमकहाणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news